राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशा भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा- “शिवसेना आमच्याच बापाची…” बंडखोर आमदारांवर संजय राऊतांची जोरदार टीका

Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना
Assembly Election 2024 Sillod Constituency Challenging Abdul Sattar print politics news
लक्षवेधी लढत: सिल्लोड: सत्तार यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर?
nandgaon assembly constituency
वंचितच्या नांदगाव माजी तालुकाध्यक्षांना माघारीसाठी धमकी

निवडणूक घेण्याचा अट्टाहास करु नये

ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पहिल्या यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने इम्पिरिकल डाटा गोळा करून अहवालही तयार केला आहे. असेही पाटील यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. ओबीसी समाजाच्या आरक्षणाची ही लढाई अंतिम टप्प्यात असून निवडणूक घेण्याचा अट्टाहास करु नये, अशी विनंतीही जयंत पाटील यांनी केली.

हेही वाचा- विदर्भात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस; ‘गोसीखुर्द’चे दहा दरवाजे उघडले

ऑगस्टमध्ये नगरपरिषदा आणि नगरपंचायतीं निवडणुका होण्याची शक्यता

ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ओबीस वर्गाकडून आंदोलनेही करण्यात आली होती. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पावसाचे नियोजन करून येत्या आठ ते पंधरा दिवसात निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश सर्वेच्च न्यायलयाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या ऑगस्टमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.