मुलींवर वाढणारे अत्याचार, भ्रूणहत्या यांसारख्या घटनांमुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण असते. त्यांना खंबीर पाठिंबा देण्याची गरज सध्या भासत आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असे अनेक उपक्रम सरकार राबवत आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणारे चौदा गाव हे मुलींना पाठिंबा दर्शवण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवत आहे. घराच्या दरवाज्यावर पुरुष प्रमुखाच्या नावाची पाटी असल्याचं आपण नेहमीच पाहतो. मात्र या गावात दरवाजावर चक्क मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आला आहेत. त्यामुळे गाव आणि त्यांचा उपक्रमाचे कौतुक जिल्ह्यात होत आहे.

मुलगी सासरी गेल्यानंतर माहेरच्यांसाठी ती पाहुणी होते. मात्र या उपक्रमामधून तिला बळ देण्याचं काम येथील जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेचा १४ गावांचा गट असून त्या गावांचा अशा प्रकारे कायापालट करण्यात आला आहे. प्रत्येक गावात घराच्या दरवाज्यावर मुलीच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. यात तळेगाव ढमढेरे, रांजणगावसांडस, दहिवडी,भांबर्डे, डिग्रजवाडी, करंजावणे, दरेकरवाडी, निमणगाव अशा एकूण चौदा गावात ५ हजार ७५५ मुलींच्या नावाच्या पाट्या बसवण्यात आल्या आहेत.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

एकीकडे मुलगी वाचवा मुलगी शिकवा असे उपक्रम राबविले जात असताना मुलींवरील अत्याचार थांबण्याचे नाव कमी होत नाहीये. उलट अत्याचार वाढत असल्याचे वेळोवेळी अधोरेखीत झालं आहे. त्यामुळे सरकारने ठोस पाऊल उचलण्याची गरज भासत आहे. दरवाजावर मुलीच्या नावाची पाटी पाहिल्यानंतर आपल्याला देखील मुलगी, बहीण, पुतणी असल्याचं नेहमी भासत राहील. त्यामुळे त्यांच्या पाठीशी गंभीर उभं राहण्यासाठी अधिक बळ मिळेल.

पुण्याच्या वाकडमध्ये तर गर्भात मुलगी असल्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटावर लाथा मारण्यात आल्याचा गंभीर प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तर देहूरोड येथे नराधम वडीलानेच मुलीला वासनेचा बळी केल्याची देखील घटना घडली होती. एकूणच काय तर मुलगी कुठेच सुरक्षित नसल्याचं अधोरखीत झालं आहे. यामुळे मुलींच आणि महिलांचं खच्चीकरण होत आहे. परंतु शिरूर तालुक्यात ज्याप्रकारे मुलींच्या नावाच्या पाट्यांचा उपक्रम राबवला जात आहे तो कौतुकास्पद असून आम्ही मुलींचा पाठीशी खंबीर उभे आहोत हेच दाखवून दिल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुलींना लढण्याच बळ मिळेल.

हा उपक्रम मुलींना प्रेरणा देण्यासाठी सुरू केला आहे. भ्रूण हत्या, बलात्कार याचं प्रमाण वाढलं असून मुलींचा मूलभूत पाया भक्कम करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.लग्न झाल्यानंतर मुलीला तिच्या नावाची पाटी माहेरी पाहिल्या नंतर वेगळा आनंद मिळेल असं जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी म्हटलं आहे.