सी डोपलर रडार पोहचण्यापूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग हाती घेता येऊ शकतो का, याची चाचपणी सोमवारी सकाळी अमेरिकेतील हवामानशास्त्रज्ञांसमवेत केली जाईल. त्यानंतर हा प्रयोग तातडीने करण्याचा निर्णय घेऊ, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले. पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथे आलेल्या विमानातही कमी क्षमतेचे एक रडार असते, त्याआधारे प्रयोग करता येऊ शकेल, असे दिवसे म्हणाले.
फसलेला प्रयोग असे वर्णन नेहमीच कृत्रिम पावसाच्या बाबतीत केले गेले आहे. मात्र, अन्य कोणताच मार्ग शिल्लक नसल्याने हा प्रयोग करण्याचे ठरविण्यात आला. अमेरिकेतील कंपनीला कंत्राट देऊन हा प्रयोग हाती घेण्यात आला. त्यासाठी विभागीय आयुक्तालयावर सी डोपलर रडार बसविण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, डोपलर यंत्रणा अद्यापि अमेरिकेतच असल्याने हा प्रयोग कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर पुढे ढकलले जात होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात प्रयोग हाती घेण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अमेरिकेतील हवामानशास्त्रज्ञही औरंगाबाद येथे रविवारी दाखल झाले. आपत्ती विभागाचे संचालक सुहास दिवसे सोमवारी येणार असून त्यांच्या समवेत होणाऱ्या बठकीत कृत्रिम पावसाचा निर्णय होणार आहे. सी डोपलर ही यंत्रणा महत्त्वाची असल्याने ती येईपर्यंत वाट पहायची की नाही, याचा निर्णय उद्या होणार आहे.
कृत्रिम पावसाच्या या प्रयोगावर सरकारने २७ कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. संपूर्ण मराठवाडय़ात रविवारी पावसाचे ढग नव्हते. निरभ्र आकाश आणि अंगावर येणारे ऊन असेच वातावरण होते. उद्या ढग आलेच तर कृत्रिम पावसाचा प्रयोग होऊ शकतो किंवा त्याबाबतचा सराव तरी होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा