जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, शुक्रवारी दौऱ्यावर येत आहेत. पारनेर, पाथर्डी व जामखेड येथील परिस्थितीची पाहणी करून ते जामखेडमध्येच जिल्हय़ाची आढावा बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा हेलिकॉप्टरने होणार असून धावपळीचा ठरणार आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टरने कान्हुरपठारला (पारनेर) आगमन होईल. मोटारीने पिंप्री पठार येथे पीक परिस्थितीची पाहणी करतील, ९.५० वाजता त्यांचे कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) आगमन, तेथून ढवळेवाडी येथे कंपार्टबंडिंगच्या कामाची पाहणी, तेथून सातवड येथे सिमेंट नाला बांधची पाहणी, वृक्षारोपण, पॉली हाऊस, मीटरने पाणीपुरवठा योजनेची पाहणी. ११.४५ वाजता हेलिकॉप्टरने कासारपिंपळगाव येथून जामखेडला रवाना, काटेवाडी (ता. जामखेड) येथे १२.०५ आगमन व जलयुक्त शिवार योजनेतील कामाची पाहणी, १२.५० वाजता राजुरी येथे कंपार्टमेंट बंडिंगच्या कामाची पाहणी, १.३० वाजता जामखेड राज लॉन्स येथे जिल्हा आढावा बैठक, २.३५ मिनिटांना हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा