महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शरद उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केलं आणि नव्याने आपण सगळा पक्ष जोडणार असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी भाजपाला उलथापालथ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती असं नाव दिलं आहे. तसंच या प्रवृत्ती आपल्या बाजूला सारायाच्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या गुरुंच्या चरणी वंदन करुन तुम्हाला हे सांगतो आहे असं भावनिक आव्हान केलं. शरद पवार यांना ऐकण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

काय म्हणाले शरद पवार?

मध्यप्रदेशसारख्या राज्यात कमलनाथ मुख्यमंत्री होते. व्यवस्थित राज्य सुरु होतं तिथे राज्य उलथवलं गेलं. जातीय दंग्यांना प्रोत्साहन देणारं सरकार तिथे आणलं गेलं. असे अनेक प्रयत्न सुरु आहेत. दिल्ली, पश्चिम बंगाल, दक्षिणेतल्या राज्यातही हेच चाललं आहे. त्यामुळे संकटाचा काळ देशावर आला आहे. चुकीच्या प्रवृत्ती राज्य करत आहेत. त्यामुळेच चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र. शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. यामागची भूमिका जातीय विचारधारा पुढे आणायची आणि त्यांच्या मार्फत देशाचा कारभार करायचा अशी आहे.

Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Harshvarrdhan Patil Meets Devendra Fadnavis
Harshvarrdhan Patil: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन; चर्चांना उधाण
sharad pawar shares stage with modi in Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan event
साहित्य संमेलनाच्या मंचावर मोदी-पवार एकत्र ? ७० वर्षांपूर्वीच्या प्रसंगाच्या पुनरावृत्तीचा आयोजकांचा प्रयत्न

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका याच प्रवृत्तीने घेतली. दुर्दैवाने त्यांना यात यश आलं. लोकशाहीचा अधिकार हा जतन करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही याची मला खात्री आहे आणि महाराष्ट्रात उलथापालथ करणारी शक्ती आहे त्यांना जागा दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही.जातीय तेढ निर्माण केली जाते आहे. या प्रवृत्ती वाढल्या आहेत. मात्र सहा महिने-वर्षभराच्या कालावधीतच निवडणुका होत आहेत. त्या कालावधीत आपण यांना यांची जागा दाखवून देऊ असंही आवाहन शरद पवार यांनी केलं. उलथापालथ करणाऱ्या शक्ती बाजूला करु आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर नेऊ असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

जोरदार पाऊस असताना आज तुम्ही सगळेजण आलात त्यासाठी मी तुमचे आभार मानतो असंही शरद पवारांनी म्हणत कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी आज नव्याने लढाई सुरु केली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपली भूमिका मांडली आहे. नव्या जोमाने सगळी टीम तयार करणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी आले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. तसंच शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

Story img Loader