महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा शिवराज राक्षे , वेताळ शेळके,संग्राम पाटील, पृथ्वीराज पाटील शुभम माने, सनी मदने महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीत कर्जत येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे. आज स्पर्धेचा तिसरा दिवस होता. खुल्या गटातील महाराष्ट्र केसरी या मानाच्या किताबासाठी कुस्त्या सुरू आहेत .यामध्ये महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार असणारे शिवराय वेताळ शेळके यांच्यासह संग्राम पाटील, पृथ्वीराज पाटील शुभम माने, सनी मदने यांनी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

राज्यातील अनेक नामांकित पैलवान या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून, प्रेक्षकांना त्यांच्या चुरशीच्या व प्रेक्षणीय कुस्त्या पहावयास मिळत आहेत.विकास गटकळ याने चिटपट कुस्ती मारली महाराष्ट्र केसरी गटामध्ये धाराशिव चा विकास गटकळ व परभणीचा देविदास खंदारे यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीची लढत झाली. पहिल्या पाच मिनिटांमध्ये दोन्हीही पैलवान समान गुणावर होते. दोन्ही पैहीलवान ताकदीचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये मोठी चुरस दिसून येत होती. पहिल्या हाफ मध्ये गटकळ याने खंदारे याच्यावर चढाई केल्यामुळे चार गुण मिळावे अशी मागणी केली. यावर हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे देण्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा टीव्ही रिप्लेवर कुस्ती पाहून याबाबत निर्णय देताना गुण फलकामध्ये कोणताही फरक झाला व यानंतर गटकळ यांनी वेगवान कुस्ती करत देविदास खांदारे यास पराभूत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला .मात्र खंदारेचा बचाव मजबूत होता. अखेर कुस्ती दुसऱ्या हाफ मध्ये सुरू झाल्यानंतर विकास गटकळ याने बाहेरची टांग लावत देविदास खंदारे चितपट केले.

अहिल्यानगरचा व स्थानिक कर्जत तालुक्यातील राशीन येथील विक्रम शेटे या मल्लाने महाराष्ट्र केसरीच्या माती विभागामध्ये गुणांवर कोल्हापूरचा भूषण माळकर यास पराभूत केले. माती विभागातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ही झालेली कुस्ती मोठी प्रेक्षणीय झाली. दोघेही पैहीलवान पहिले काही मिनिट एकमेकाचा अंदाज घेत स्वतःची शक्ती व दम छाक होऊ नये यासाठी काळजी घेताना गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. भूषण माळकर यांने विक्रम शेटे याच्यावर चढाई करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु त्याच्यापेक्षा ताकतीने जास्त भरलेल्या विक्रम शेटे यांनी प्रत्येक वेळेस चढाई रोखून धरली. पहिल्या फेरीमध्ये दोघांचेही समान पाच गुण होते.

दुसऱ्या फेरीमध्ये कुस्तीने वेग घेतला. विक्रम शेटे यांनी चढाई करून भूषण माळकर यास चितपट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंचांनी दिलेल्या गुणावर विक्रम शेटे यांच्या प्रशिक्षकांनी हरकत नोंदवली. यानंतर तिसऱ्या पंचाने पुन्हा एकदा कुस्ती पाहून हरकत फेटाळून लावली आणि पंचांनी दिलेली गुण योग्य असल्याचे दाखवले. शेवटच्या मिनिटांमध्ये विक्रम शेट्टी यांनी भूषण माळकर याला खाली घेत सलग चार गुण पटकावले. आणि गुणांवर विजय मिळवला.आज तिसऱ्या दिवशी नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध छत्रपती संभाजी नगर येथील अनिल राठोड यांच्यामध्ये कुस्ती झाली. कुस्ती सुरू झाल्यानंतर अवघ्या एक मिनिटाच्या आतच अनिल राठोड यांनी शिवराज राक्षे याला पुढे चाल दिली आहे. यामुळे पंचांनी शिवराज राक्षे यास विजय घोषित केले. महाराष्ट्र केसरी गादी विभाग दुसऱ्या फेरीत संग्राम पाटील (कोल्हापूर), ओंकार हुलवळ (वाशिम), शिवराज राक्षे (नांदेड), अण्णा यमकर (सांगली), रमेश बहिरवळ (बीड ), पृथ्वीराज पाटील (मुंबई उपनगर), विकास गटकळ (धाराशि, शुभम माने (सोलापूर) यांनी विजय मिळवला.

महाराष्ट्र केसरी माती विभाग दुसऱ्या फेरीत

लक्ष्मण देशमुख( ठाणे शहर), सनी मदने (सांगली), वेताळ शेळके (सोलापूर), विक्रम शेटे (अहिल्यानगर), अनिल जाधव (नांदेड), पृथ्वीराज खडके (पुणे शहर), प्रशांत जगताप (अकोला), अनिकेत मांगडे (पुणे जिल्हा) विजय झाले . ७९ किलो गादी विभाग मध्ये दुसऱ्या फेरीतील विजयी महेश कुंभार (मुंबई शहर), संदीप लटके (अहिल्यानगर), विवेक शेंडगे (बीड), आकाश देशमुख (लातूर), हरीश पवार (नाशिक जिल्हा) , महेश पांगरकर (जळगाव), प्रवीण पाटील (कोल्हापूर जिल्हा), अमित सूळ (वर्धा), सागर भेदोडकर (चंद्रपूर), संदीप गायकवाड (ठाणे शहर ) ७९ किलो माती विभाग राहुल कोरडे (सातारा), प्रणव हांडे (सोलापूर जिल्हा), पृथ्वीराज वाडकर (मुंबई उपनगर), नाथा पवार (सांगली), अक्षय साळवी (कोल्हापूर), रामेश्वर वाघ (बुलढाणा(, गंडू भोसले (सोलापूर शहर), विष्णू तात्पुरे (लातूर )