राज्यात लॉकडाऊन लागणार का? निर्बंध लागू होणार का? किती आणि कसे निर्बंध लागू होतील? यावर सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. पण एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन बाधितांचा आकडा देखील एक हजाराच्या दिशेने सरकू लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ३६ हजार २६५ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्याच आजपर्यंत करोनाची बाधा झालेल्या व्यक्तींची संख्या आता ६७ लाख ९३ हजार २९७ इतकी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात आज ३६ हजारांहून जास्त बाधितांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ लाख १४ हजार ८४७ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ७९ हजार २६० रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.

ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ

दरम्यान, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ७९ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण ओमायक्रॉन बाधितांचा आकडा आता ७७६ इतका झाला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये मुंबईत ५७, ठाण्यात ७, नागपूरमध्ये ६, पुण्यात ५, पुणे ग्रामीणमध्ये ३ तर पिंपरी चिंचवडमध्ये एका बाधिताची नोंद झाली आहे.

दिवसभरात ८९०७ रुग्णांना डिस्चार्ज

आध दिवसभरात एकूण ८ हजार ९०७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनावर मात केलेल्या बाधितांचा आकडा आता ६५ लाख ३३ हजार १५४ इतका झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९६.१७ टक्के इतका आहे.

१३ करोनाबाधितांचा मृत्यू

दरम्यान, आज दिवसभरात एकूण १३ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता १ लाख ४१ हजार ५९४ झाला आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर २.०८ टक्के आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Todays corona cases in maharashtra positivity rate omicron patients also increased pmw
Show comments