राज्यात तूर्तास लॉकडाउन लागू केला जाणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं असलं, तरी गर्दी नियंत्रित करणारे कठोर निर्बंध घातले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू होण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यातच आज दिवसभरात तब्बल २६ हजार ५३८ नव्या करोनाबाधितांची भर राज्याच्या एकूण आकड्यामध्ये झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅक्टिव्ह करोनाबाधिताचा आकडा आता ८७ हजार ५०५ इतका वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल ७९७ वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात वाढ झालेल्या बाधितांमुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण बाधितांचा आकडा ६७ लाख ५७ हजार ०३२ इका झाला आहे. त्यापैकी ८७ हजार ५०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
5 Zika virus patients died in Pune Print news
धोका वाढला! पुण्यात झिकाच्या ५ रुग्णांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या शंभरवर पोहोचली
vegetable prices increased in pune marathi news
पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी
loksatta analysis, Jayakwadi Dam water use
विश्लेषण : जायकवाडी भरूनही मराठवाड्याला फायदा काय? समन्यायी पाणीवाटपाचा मुद्दा अजूनही का अनुत्तरित?
In Pune the number of chikunguniya patients has doubled with dengue
पुण्यात डेंग्यूसोबत चिकुनगुन्याचा ‘ताप’! रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; आरोग्य विभाग धास्तावला
low price to mung, soybean, mung price,
सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?
rain Maharashtra, rain news, Maharashtra weather,
राज्यात पावसाचा जोर कमी होणार ? जाणून घ्या, गुजरातमध्ये मुसळधार आणि राज्यात उघडीप का ?

आज दिवसभरात राज्यातील एकूण ५ हजार ३३१ बाधित करोना निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत ६५ लाख २४ हजार २४७ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९६.५५ टक्के इतका असल्याची नोंद करण्यात आली आहे.

राज्याचा मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर

दरम्यान, राज्यात आज दिवसभरात ८ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा एकूण मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर आला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात करोनामुळे १ लाख ४१ हजार ५८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ओमायक्रॉनची राज्यात काय परिस्थिती?

राज्य सरकारने आजची ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी देखील जाहीर केली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल १४४ ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी मुंबईत १००, नागपूरमध्ये ११, ठाणे आणि पुणे मनपा क्षेत्रात ७, पिंपरी-चिंचवडमध्ये ६, कोल्हापूरमध्ये ५, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडी मनपा क्षेत्रात प्रत्येकी २ तर पनवेल आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी १ ओमायक्रॉन बाधित सापडल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ७९७वर गेला आहे.