Marathi News Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध घटना घडत आहेत. यामध्ये राजकीय आणि गुन्हेगारी घटनांसह पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाचाही समावेश आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत मराठी बोलण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केल्यामुळे, त्यांच्या या भूमिकेवर उत्तर भारतातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आज महत्मा फुले यांची १९८ वी जयंती आहे. त्या निमित्ताने आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सत्ताधारी मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे हा मुद्दाही पुढे आला आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी आज माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना राज्यभरात सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. यासह राज्यातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ११ एप्रिल २०२५ रोजीच्या लाईव्ह अपडेट्स.
नाईकांचे दरबार अर्धे रिकामे
सार्वजनिक बांधकाम विभागात गट क पदावर नोकरी लावण्याचे आमिषाने दाखवून पुण्यातील एका तरुणाला दोघांनी तब्बल तीन लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी उदय शिंदे (वय 50 ,रा.कोल्हापूर), अरुण देशमुख (वय 40 रा.सांगली) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मागील अनेक महिन्यापासून 21 वर्षीय स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता.त्याच दरम्यान त्याची एका महिलेसोबत ओळख झाली आणि त्या महिलेच्या माध्यमातून आरोपी उदय शिंदे आणि अरुण देशमुख यांच्यासोबत ओळख झाली.
त्या दोघांनी तरुणाला बांधकाम विभागात नोकरी लावतो असे सांगितले. त्यासाठी 12 लाख रुपये लागतील.या कामासाठी सुरुवातीला 3 लाख रुपये द्यावे लागतील आणि राहिलेले 9 लाख रुपये नियुक्ती झाल्यावर देण्याचे ठरले. त्यानुसार त्या तरुणाने दोघांवर विश्वास ठेवून 3 लाख रुपये दिले. काही दिवसानंतर त्या तरुणाकडून आवश्यकती कागदपत्रे घेण्यात आल्यानंतर बांधकाम विभागात नियुक्ती झाल्याची ऑर्डर देखील देण्यात आली.त्यानंतर संबधित तरुण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेल्यावर ती नियुक्तीची ऑर्डर बनावट असल्याचे समोर आले.आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले.त्यावर दोघा आरोपीकडे त्या तरुणाने पैशाची मागणी केली.पण त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली.त्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणाने आमच्याकडे उदय शिंदे,अरुण देशमुख यांच्या विरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.
भोम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये १७ लाख ७५ हजार ३७५ रुपयांचा अपहार ; तत्कालीन सचिवावर गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील भोम गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये १७ लाख ७५ हजार ३७५ रुपये २० पैसे इतक्या रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात संस्थेचा तत्कालीन सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भोम गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये लेखापरीक्षण करीत असताना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संस्थेचा तत्कालीन सचिव योगेश प्रमोद भोबेकर, रा. मालदोली, ता. चिपळूण याच्या विरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सहकार निबंधक कार्यालयाने घेतली आहे.
फिर्यादी वैभव रामचंद्र ठसाळे (वय ४२) रा. चिपळूण, हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०२३-२०२४ या वर्षाचे भोम विविध कार्यकारी सोसायटीचे लेखापरीक्षण केले. या तपासणीदरम्यान संस्थेचा सचिव कर्मचारी योगेश प्रमोद भोबेकर याने संस्थेच्या व्यवहारांची चुकीची माहिती संचालक आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू न देता अपहार केल्याचे आढळून आले आहे. या लेखापरीक्षणात भोबेकर याने एकूण १७ लाख ७५ हजार ३७५ रुपये २० पैसे इतक्या रक्कमेचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती मिळताच संस्थेचे लेखा परीक्षक वैभव ठसाळे यांनी भोम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, भोमचे वैधानिक लेखा परीक्षक या नात्याने चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी योगेश प्रमोद भोबेकर याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानुसार भोबेकर याच्याविरोधात चिपळूण पोलिसांनी भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
डोंबिवली, कल्याण परिसरात मोबाईल चोरणारा सराईत चोरटा अटकेत
पाचशे रुपयांची लाच स्वीकारतांना मोटार वाहन निरिक्षकाला अटक
पावसाळ्यात वारंवार खड्डे पडणाऱ्या रस्त्यांची पाहणी करा, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
चालू वर्षातही सव्वा दोन कोटींचे धान गहाळ; देऊळगाव केंद्रावरील घोटाळ्याची व्याप्ती वाढली
राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचे पूनर्वसन होणार, वनमंत्री गणेश नाईक
१५ ते २० आमदारांसह मुनगंटीवार मोदींच्या मंत्र्याला भेटणार….म्हणाले, मी सर्वांना सोबत घेईन आणि…
सोलापुरात ऊस देयके थकविणाऱ्या दहा कारखान्यांना जप्तीची नोटीस, कारखानदारांचे धाबे दणाणले
शाळा सोडून गेल्याने शिक्षिकेची बदनामी, संस्थाचालकावर गुन्हा दाखल
नागपूर शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत हवे, पालकमंत्री बावनकुळे
दोन बिबट्यांचा मृत्यू ; मांसातून विष…
नागपूरमध्ये आयपीएलचा सामना? – वाचा कसा आणि कधी…
दहा वर्षापासून न्यायालयात सुनावणी नाही,मग थेट गुन्हाच रद्द…
आता भर उन्हाळ्यात शाळेत ‘पोषण पंधरवडा’, शिक्षकांमध्ये नाराजी
Video : रेल्वे प्रवाशाला उपहारगृहात डांबून मारहाण, गितांजली एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना, कॅंन्टीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्राशी संबंधित प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि रेल्वे स्टेशन विकासासाठी १ लाख ७३ हजार कोटी रुपये मंजूर
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, “मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींनी गोंदिया ते बल्लारशाह या रेल्वे मार्गाचे ४८१९ कोटी रुपयांचे दुहेरीकरण मंजूर केले आहे. पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळात, महाराष्ट्रासाठी अनेक रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. मनमाड-इंदूर मार्ग, भुसावळ-खंडवा मार्ग आणि आता ही मार्गिका. महाराष्ट्राशी संबंधित प्रकल्प, फ्रेट कॉरिडॉर, बुलेट ट्रेन आणि रेल्वे स्टेशन विकासासाठी एकूण १ लाख ७३ हजार ८०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.”
भविष्यात पीडित, वंचित राजकारण्यांची संघटना निघेल – जयकुमार गोरे
सांगली : यापुढील काळात पीडित, वंचित आणि विस्थापित राजकारण्यांची एखादी संघटना काढावी लागेल अशी मिश्कील टिप्पणी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी केली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या डिजिटल मीडियाचे राज्यव्यापी अधिवेशन गुरुवारी सांगलीतील एसबीजीआयच्या सभागृहात पार पडले. मंत्री गोरे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन पार पडले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार अशोक वानखेडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी खा. विशाल पाटील, संघटनेचे संघटक संजय भोकरे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे आदींसह राज्यभरातून विविध माध्यम प्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, ‘एक राजकारणी घडायला फार वेळ लागतो. प्रस्थापित नेते आणि राजे-महाराजे यांच्या विरोधात लढा उभा करून मी राजकारणात यशस्वी होऊ शकलो हे फक्त पत्रकारांच्या पाठबळामुळेच. काही दिवसांपूर्वी माझ्यावर खोटे आरोप केले. या प्रकरणातील अनेकांचे दूरध्वनीवरील ध्वनिमुद्रण माझ्या मोबाइलमध्ये आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू आहे, म्हणूनच मी आता गप्प आहे.’
रत्नागिरीत जलजीवन मिशनच्या कामात सुमारे ६०० कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार? चौकशी समितीकडून रत्नागिरी जिल्हा परिषदेची होणार चौकशी
कोल्हापुरातील कृषी विद्यापीठाच्या जागेत आयटी पार्क
मुंबई : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क येथील जागा आयटी पार्क आणि दंत महाविद्यालयासाठी देण्याची मागणी केली जात होती. तथापि, ही जागा राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ताब्यात आहे. ही जागा हस्तांतर करून विद्यापीठासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी शेंडापार्क येथील जागेची अदलाबदल करण्यास महसूल विभागाने तयारी दर्शविली आहे.
राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात असेल आणि त्यांची तयारी असेल तर त्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावा. कृषी विद्यापीठाने आपणास मिळणारी जागा ही शेती आणि संशोधनास योग्य अशी मिळावी आणि जागेच्या अदलाबदलीमध्ये त्या ठिकाणच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ही जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या बैठकीला कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणतात.. ..तर रामदेवबाबांवर योगासन करण्याची वेळ…
कोरेगावातील चिमणगावमध्ये नऊ घरे जळून खाक
सातारा : कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे दुपारी वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लमाण वस्तीमध्ये आग लागली. वस्तीतील नऊ कुटुंबीयांची घरे जळून खाक झाली. तसेच त्यालगत असलेल्या पाच शेतकऱ्यांची लाखो रुपयांची वैरण जळाली. जरंडेश्वर शुगर मिलच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठी हानी टळली. चिमणगाव येथे उमेश राठोड व विजापूर जिल्ह्यातील नऊ कुटुंबीय शेती व अन्य कामांसाठी चिमणगाव येथे आणले आहेत. ही सर्वजण एकाच परिसरात घरे बांधून राहिले आहेत. या परिसराला लमाणवस्ती म्हणून ओळखले जाते. १६ झोपड्या वजा घरांमध्ये ५० लोक वास्तव्यास आहेत.
सकाळी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी लमाण वस्तीतील लोक गेले होते. दुपारी महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाले, त्यामुळे या वस्तीला आग लागली. बघता बघता सर्व घरे जळून खाक झाली. घराजवळ असलेल्या दुचाकी देखील आगीच्या तडाख्यात सापडल्या. या वस्तीलगतच शेतकरी दत्तात्रय अंकुश भगत, अक्षय महादेव जाधव, अमित अशोक भगत, रमेश एकनाथ भगत, संजय तुकाराम भगत यांची वैरणीची गंज होती. त्यामध्ये साडेतीन हजार वैरणीच्या पेंड्या होत्या. या देखील जळून खाक झाल्या. या घटनेत पाच शेतकऱ्यांचे पंधरा लाख रुपयांचे व इतर एकूण ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
पालघर येथे ‘ईएसआयसी’ रुग्णालयासाठी जागा
मुंबई : पालघर जिल्ह्यातील कुंभवती येथे १५० खाटांचे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे. हे रुग्णालय या परिसरातील रुग्णांसाठी अत्यावश्यक बाब असून यासाठी एक रुपये भाडेतत्त्वावर शासकीय जागा उपलबध करून देण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कुंभवती येथील ही जमीन १५० खाटांचे ‘ईएसआयसी’ रुग्णालय बांधण्यासाठी नाममात्र शुल्कात मिळण्याबाबत मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पालघर परिसरात ‘ईएसआयसी’ रुग्णालय अत्यावश्यक असल्याने सदर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने शासनाकडे सादर करावा. एक रुपये भाडेतत्त्वावर जागा देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. या बैठकीला खासदार हेमंत सवरा, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखर उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.