नितीन बोंबाडे, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डहाणू : पालघर जिल्ह्य़ात डहाणू, तलासरी, पालघर, विक्रमगड तालुक्यांत खजुरी, ताड, माड तसेच नारळाच्या झाडापासून मिळणाऱ्या ताडीची विक्री हा ग्रामीण अर्थव्यस्थेचा घटक आहे. साधारण नोव्हेंबर ते जूनपर्यंत आठ महिने चालणाऱ्या ताडी व्यवसायावर हजारो कुटुंबे चालतात. ताडी दुकानांचा लिलाव पद्धतीने परवाने देऊन ताडी व्यवसाय चालतो. तर आदिवासी भागात टीआरटीपी योजनेतून लहान दुकाने चालवली जात असल्याने रोजगार केंद्र म्हणून ताडी व्यवसायाकडे पाहिले जाते.
डहाणू, तलासरी या तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून सर्वात जास्त खजुरीच्या झाडापासून ताडी काढली जाते. डहाणूमध्ये करजगाव, वंकास, गांगणगाव, नागझरी, धुंदलवाडी, अंबोली, धानीवरी, गंजाड, तलासरी तालुक्यांत काजळी, उपलाट, सूत्रकार, वरवाडा या भागांत खजुरीची ताडी मोठय़ा प्रमाणात काढली जाते. डहाणूमध्ये चारोटी, घोळ, वेती, वरोती, रानशेत, जामशेत, आंबेसरी, आशागड तसेच इतर भागांत माडाची ताडी मोठय़ा प्रमाणात विक्री होते. ताडी व्यवसाय हा येथील आदिवासींच्या रोजगार व मिळकतींचे चांगले साधन आहे.
डहाणू तालुक्यातील कोसबाड या ठिकाणी निरा उत्पादन मोठय़ा प्रमाणात केले जाते. ताड तसेच शिंदीच्या झाडावरील खोडास विशिष्ट खोलीवर खाच पाडून त्यातून निघणारा रस म्हणजे निरा होय. खजुरीप्रमाणे माडाची देखील ताडी प्रसिद्ध आहे. माडाचेदेखील दोन प्रकार आहेत एक म्हणजे माड आणि दुसरा म्हणजे तली यामध्ये माडाला माड (ताडगोळे) लागतात तर तलीला माड (ताडगोळे) लागत नाहीत. समुद्रकिनाऱ्यावर नारळाच्या झाडापासून देखील ताडी काढली जाते.
ताडी उतरवणीची पारंपरिक पद्धत
डहाणू, तलासरी या तालुक्यांत सर्वात जास्त खजुरीची ताडी काढली जाते. काही भागांत या झाडाला शिंधीचे झाड असेही म्हणतात. पावसाळा संपला की शिंदी किंवा आपल्या स्थानिक भाषेत खजुरीचा बुंध्याकडील भाग धारधार कुऱ्हाडीने साफ करण्यास सुरुवात केली जाते त्याला ‘शेलवणी‘ म्हणतात. शेलवणी दोन वेळेस करतात. त्यानंतर विशिष्ट प्रकारची खोच पाडून खालच्या बाजूस मडके लावून रस गोळा करतात. खजुरीला जे भोके पाडली जातात त्याला शेव असे म्हणतात. ताडी गळायला सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे आठवडाभर झाडाना आराम दिला जातो. याला डालनी दिली असे म्हणतात. एक खजुरी चार ते पाच दिवस ताडी देते मग ढालनी देतात. मग शेव करून परत सुरू करतात. डालनीनंतर जी ताडी काढली जाते त्याला बांधनीची ताडी असे म्हणतात.
आदिवासी भागात टीआरटीपीनुसार दुकाने दिली जातात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने ताडी विक्रीला परवानगी दिली आहे. बेकायदेशीर ताडी विक्री वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे.
– विजय भुकन, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग
ताडी काढणीच्या कामाला आता व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतीबरोबर ताडीचाही व्यवसाय केला जातो. त्यामुळे आदिवासी लोकांना यातून दोन पैसे मिळतात व त्यांची गुजराण होण्यास मदत होते.
– चंद्रकांत घाटाळ, कासा