उदयनराजेंनी काेणत्या संस्था काढल्या आणि किती लाेकांचे संसार चालविले हे त्यांनी सांगावे. उदयनराजे नेहमी अजिंक्य उद्याेग समूहावर भ्रष्टाचाराबाबत बाेलतात त्यांनी तेच तेच जूने तुण तुणे बंद करावे. समाेरा समाेर या हे नेहमीचे डायलाॅग बंद करा तुमच्या या डायलाॅगला आता सातारकर कंटाळले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मी तर म्हणताे टोलनाका चालवणाऱ्यांचा जन्म घराण्यात कसा झाला अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजेंवर केली आहे. मागील आठवड्यात उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टोकाचे आरोप करत टीका केली होती. त्याला आज शिवेंद्रसिंहराजेंनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. छत्रपती घराण्यात जन्मलेल्यांनी टाेला नाका चालवावा. लाेकांकडून पैसे वसूल करावेत हे कितीपत याेग्य आहे. पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे वसूली करणा-यांवर चाप लावत असतं. परंतु सध्या वेगळेच सुरु आहे असा टाेला आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांनी लगावला आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले म्हणाले, अजिंक्यातारा सहकारी कारखाना उत्तम चालला आहे. अजिंक्यतारा कारखाना एका हंगामात २१३ कोटी रुपये शेतकऱ्यांना देतो. या कारखान्याची उलाढाल ३६० काेटींची आहे.शेतकऱ्यांची बिले पंधरा दिवसाच्या आत जमा केली जातात .सूतगिरणी मध्ये दोनशे कामगार कामाला असून तीन कोटी रुपये पगाराला आणि बोनसला वीस लाख रुपये दिले जातात त्या माध्यमातून सातारा तालुक्याच्या अर्थकारणामध्ये अजिंक्य उद्योग समूहाचे मोठा हातभार आहे असे असताना आपण काहीच केलेले नाही त्यामुळे आपण अजिंक्य उद्योग समूहाच्या भ्रष्टाचाराचे जे तुंणतुणे वाजवत आहात ते आपण बंद करावे.
हेही वाचा >>> सांगली : महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडीला लाखाचे बक्षिस जाहीर
दरम्यान तुमच्या आघाडीने पालिकेत केलेला भ्रष्टाचार आम्ही जनतेसमाेर मांडत राहणार. सामान्य कुटुंबातील महिलेला नगराध्यक्षाचा कारभार करुन दिला नाही. गेल्या पाच वर्षात पालिका धुण्यापलीकडे तुम्ही काही केले नाही हे सातारकरांना देखील कळून चुकले आहे.पाच वर्षाचा भ्रष्टाचार कारभाराचा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच तुम्ही भावनिक राजकारण करत आहात सातारा पालिका भ्रष्ट मुक्त करण्यासाठी आम्ही आता तयारीला लागलेलो आहोत. सातारकर लवकरच उदयनराजे आणि त्यांच्या आघाडीला नारळ देणार यात शंका नाही. माझ्या सारखी छत्रपतींच्या घराण्यात कशी जन्मली असे उदयनराजेंनी म्हटलं हाेते. मी तर म्हणतो टोलनाका चालवणाऱ्यांचा जन्म घराण्यात कसा झाला. छत्रपतींचा वारसा सांगणा-यांनी लाेकांना त्रास द्यायचा, दादागिरी करायचे असे वागावे का. त्यामुळे टाेल नाका चालविणा-या खासदारांनी मला शहाणपणा शिकवू नये असा इशारा देखील शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिला.