राज्य शासनाने बीओटी तत्त्वाचा स्वीकार केला आहे. याआधारेच कोल्हापुरातील रस्ते विकास प्रकल्प आकाराला आला आहे. टोल संदर्भातील त्रुटी शोधून मार्ग काढला जाईल. पण टोल रद्द होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासन टोल आकारणीच्या बाजूने असल्याने बुधवारी ठामपणे स्पष्ट केले.  
सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांचे दुपारी येथील विमानतळावर आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या माध्यमातून राज्यात विकासाची अनेक कामे होणार आहेत.

Story img Loader