‘ नानासाहेब कदम या शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विकली. व्यापाऱ्यांना विकली असती तर लिलाव होऊन २४ तासात पसे मिळाले असते. सरकारला तूर विकून आपण फसलो असल्याची भावना नानासाहेबांच्या मनात आहे. ती व्यक्त करताना ते म्हणाले, ‘मागे दवाखाना लागला आहे. तूर विकूनही स्वतच्या कष्टाचे पसे सरकार देत नाही.’ ही केवळ एका शेतकऱ्याची अवस्था नाही, तर सरकारी केंद्रांमध्ये तूर विकणाऱ्या अध्र्याहून अधिक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. आता गोदाम काठोकाठ भरले आहेत आणि बारदानाही संपला आहे. पिकवूनदेखील वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.

जिल्ह्य़ात एक लाख चार हजार िक्वटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापोटी ५२ कोटी ८४ लाख २१ हजार ९०० रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ २५ कोटी ४२ लाख २५ हजार रुपये एवढीच रक्कम तूर उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आली. हमीभाव मिळावा या आशेने केंद्रावर तूर विक्री करणाऱ्या सहा हजार २९६ शेतकऱ्यांचे तब्बल २७ कोटी १५ लाख रुपये सरकारकडे थकले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत कर्जबाजारी शेतकऱ्यांची देणी द्यायला राज्य सरकारला उसंत नसल्यामुळे ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

खरेदी करण्यात आलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली आहे. तीन हजार १६० मे. टन क्षमता असलेल्या गोदामात सध्या चार हजार ४२२ मे. टन साठा करण्यात आला आहे. १४० टक्के क्षमतेने भरलेल्या गोदामात तूर ठेवण्यासाठी आता जागा शिल्लक नाही. दुसरीकडे बारदाना संपल्यामुळे कोणतीही घोषणा न करता तूर खरेदी केंद्रांनी आपले दरवाजे बंद करून घेतले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नेलेल्या तुरीचे अद्याप माप झालेले नाही. अडतीवर २४ तासात रिकामे होणारे शेतकरी सरकारच्या खरेदी केंद्रावर मात्र अडकून पडले आहेत. उत्पादन घेण्यासाठी झालेला खर्च, मजुरांचा मागे सुरू असलेला तगादा, निवडणुकीच्या धामधुमीत सामान्य शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे.

तूर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे सुमारे २७ कोटींहून अधिक रुपये देणे बाकी आहे. प्रधान कार्यालयाकडून रक्कम वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.  गोदाम भरल्यामुळे  खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही. बारदाना उपलब्ध होईल, पण रक्कम टप्प्याटप्प्याने येत आहे.

आबासाहेब मगर (जिल्हा पणन अधिकारी)

Story img Loader