आमीर खान याच्या ‘पीके’ या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी करत इचलकरंजीत भाग्यरेखा चित्रमंदिर व मध्यवर्ती चौकातील पोस्टर्स फाडून टाकण्यात आली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील पोस्टर्स फाडून त्यांची होळी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
आमीर खान याचा ‘पीके’ चित्रपट प्रदíशत झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात िहदू देवदेवतांची विटंबना करण्यात आली असल्याने त्यावर बंदी घालावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. पण सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतर त्यातील दृश्ये कापता येणार नाहीत असे सांगण्यात आले. पण हिंदुत्ववादी संघटनांनी आपल्या मागणीवर ठाम राहात आंदोलन सुरू केले.
मंगळवारी शहर व परिसरातील कार्यकत्रे एकत्र जमले व त्यांनी प्रथमत: भाग्यरेखा चित्रमंदिरावरील पोस्टर्स फाडली. त्यानंतर शहरातील विविध भागांत लावण्यात आलेली पोस्टर्स फाडून टाकून ती जाळण्यात आली. तर दुपारी सुरू असलेला खेळही बंद पाडण्यात आला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला होता. अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी चित्रपटगृह व चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. हा चित्रपट पुन्हा सुरू केल्यास परिणामांना चित्रपटगृह मालक जबाबदार असतील असा इशारा व दम आंदोलकांनी दिला आहे.
 

Story img Loader