Torres Ponzi Scam in Mumbai: मुंबई, ठाणे, कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ‘टोरेस’ नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीनं हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली. वर्षभर व्यवसायही केला. पण संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पोबारा केला. ‘टोरेस’ शोरूमच्या घोटाळ्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. हर्न प्रायव्हेट लिमिटेड ही मूळ कंपनी असलेल्या ‘टोरेस’ने मुंबई, ठाणे, कल्याण आणि आसपासच्या भागातल्या जवळपास सव्वा लाख ग्राहकांना गंडा घातला असून घोटाळ्याचा आकडा किमान एक हजार कोटींच्या घरात असल्याचं बोललं जात आहे. पण हा घोटाळा नेमका झाला तरी कसा? एवढे लोक कसे फसवले गेले?

सोमवारी मुंबईसह इतर भागातल्या ‘टोरेस’च्या सर्वच शोरूमसमोर गुंतवणूकदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हळूहळू त्यात भर पडली. चर्चा सुरू झाली आणि नेमका प्रकार सगळ्यांच्या लक्षात येऊ लागला. गुंतवणुकीवर दर आठवड्याला ११ टक्के व्याज परतावा देण्याचं आमिष दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केल्यानंतर अचानक कंपनीचे सर्व शोरूम बंद झाले होते. गुंतवणूकदारांना यातून समजायचा तो अर्थ समजला आणि एकच गोंधळ उडाला. पोलीस तक्रार झाली. पोलिसांनी तातडीनं पावलं उचलून कंपनीच्या तीन वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना अटकही केली. पण या सगळ्या घोटाळ्याचे खरे सूत्रधार असणारे कंपनीचे दोन संस्थापक मात्र युक्रेनला पसार झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

Bhandara, Selfie , tiger , Suhani tiger ,
VIDEO : झुडपात बसलेल्या वाघासोबत चक्क ‘सेल्फी’, सुहानीच्या बछाड्याला पुन्हा लोकांनी…..
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
Viral Video
गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १२ गाड्यांचा ताफा घेऊन निघाला गँगस्टर, Video Viral होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आयुष्यात कधीच अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही, कुणाची हिंमतही…”, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”

कसा झाला घोटाळा?

शिवाजी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टोरेस’चे मुंबई महानगर हद्दीत एकूण सहा आलिशान शोरूम होते. यात दादर, ग्रँट रोड, कांदिवली, मीरा रोड, कल्याण आणि सानपाड्यातील शोरूमचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये हे सर्व शोरीम सुरू करण्यात आले होते. या प्रकरणात फसगत झालेल्या गुंतवणुकदारांनी सुरुवातीपासून काय घडलं याची माहिती दिली आहे. त्यानुसार, ‘टोरेस’ने सुरुवातीला पूर्ण शहरात मोठे सेमिनार्स घेतले. त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना भल्यामोठ्या परताव्यांचं आमिष दाखवून आकर्षित केलं.

“कंपनीनं प्रामुख्यानं चार प्रकारच्या योजना आम्हाला सांगितल्या. त्यानुसार पहिली दर आठवड्याला २ टक्के व्याज परताव्यासह सोन्यात गुंतवणूक, ३ टक्के व्याज परताव्यासह चांगीमध्ये गुंतवणूक, ४ टक्के व्याज परताव्यासह मेझेनाईट स्टोनमध्ये गुंतवणूक आणि फक्त मोझेनाईट खड्यांमध्ये गुंतवणूक केल्यास ५ ते ६ टक्के व्याजदर परतावा मिळेल असं सांगण्यात आलं”, अशी माहिती शिवडीतील एक गुंतवणूकदार गीता गुप्ता यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. गीता गुप्ता यांचं या घोटाळ्यात १५ लाखांचं नुकसान झालं आहे.

आधी सोनं, शेवटी पैशांत गुंतवणुकीचं आवाहन!

हळूहळू ‘टोरेस’नं गुंतवणुकीवरील व्याजदर परतावा वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे अधिकाधिक लोक योजनांमध्ये गुंतवणूक करू लागले. त्यांनी पैशांच्या स्वरूपात गुंतवणूक करण्यास लोकांना उद्युक्त केलं. त्यातून आठवड्याला थेट ११ टक्के व्याजदर परतावा देण्याचं आश्वासन दिलं. त्याशिवाय जर कुठल्या गुंतवणूकदारानं नवीन गुंतवणूकदार कंपनीकडे आणले, तर त्या व्यक्तीला २० टक्के व्याजदर परतावा मिळेल, असं कंपनीनं सांगितल्याचंही गुप्ता यांनी नमूद केलं.

Torres Fraud: मुंबई, ठाण्यातील ‘टोरेस’ घोटाळा, थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन; आरोपी रशिया व उझबेकिस्तानचे, तर मास्टरमाईंड युक्रेनचा!

“गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर विश्वास बसावा म्हणून कंपनीचे पदाधिकारी सेमिनार्समध्ये दावा करायचे की त्यांना स्वस्तात सोनं मिळत असल्यामुळे त्यातून ३०० टक्के नफा होत आहे. या ३०० टक्क्यांमधूनच आपण हा अविश्वसनीय व्याजदर परतावा देत आहोत. यामुळे गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर विश्वास बसायचा. त्यातून मोठमोठ्या रकमांची गुंतवणूक ‘टोरेस’मध्ये झाली”, अशी माहिती दुसरे एक गुंतवणूकदार सलीम अन्सारी यांनी दिली.

“काही गुंतवणूकदार तर एजंटसारखंच काम करत होते”

“सुरुवातीला लोकांनी पैशांमध्ये थोडीफार गुंतवणूक केली. पण त्यांना वेळेत दर आठवड्याला व्याजदर परतावा मिळायला लागल्यानंतर त्यांनी स्वत: तर मोठ्या रकमेची गुंतवणूक केलीच, पण त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही गुंतवणूक करायला भाग पाडलं. काही गुंतवणूकदार तर स्वत: आणखी गुंतवणूकदार कंपनीकडे आणण्यासाठी एजंटसारखं काम करू लागले. त्यातून त्यांना अतिरिक्त व्याजदर परतावा मिळू लागला. पण यातून कंपनीकडे पैसा जमा झाल्यावर या सगळ्यांचे पैसे शेवटी बुडाले”, अशा शब्दांत एका पोलीस अधिकाऱ्यानं या घोटाळ्याबाबत सांगितलं आहे.

बनावट दरोडा, ‘टोरेस’ची शक्कल!

या घोटाळ्यातील आरोपींनी खूप आधीच १ जानेवारी २०२५ ला सर्व शोरूम बंद करायचे आणि पसार व्हायचं असं ठरवलं होतं, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यांच्या नियोजनानुसार त्यांनी दादर पश्चिममधली शाखा वगळता इतर सर्व शाखा बंद केल्या. ही शाखाही सोमवारी बंद करण्याच्या तयारीत ते होते, पण त्यांचा प्लॅन फसला. लोकांनी शोरूमकडे धाव घेतली.

हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर तिथल्या गुंतवणूकदारांना मोबाईलवर मेसेजेस येऊ लागले. काही कर्मचाऱ्यांनी घोटाळा केला असून कंपनीच्या सानपाड्यातील स्टोअरवरदेखील त्यांनी दरोडा टाकला आहे, असं त्या मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं. याशिवाय, गुंतवलेली रक्कम परत मिळण्यासाठी कंपनीकडून काही गुंतवणूकदारांना एक फॉर्मदेखील पाठवण्यात आला होता. पण त्यांच्या पळ काढण्याच्या योजनेचाच हा एक भाग होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे. हा तथाकथित दरोडा सीसीटीव्ही फूटेजमध्येही कैद झाला. पण तो सगळा दरोड्याचा बनावच होता, हे पोलीस चौकशीत समोर आलं आहे. यातून पळून जाण्यासाठी त्यांना थोडा अधिक अवधी मिळाला, असं पोलीस म्हणाले.

Video: “आठवड्याला ११ टक्के व्याज मिळणार होतं, पण…”, ‘टोरेस’नं ग्राहकांना फसवलं, पैसे गुंतवून पश्चात्ताप झाल्यानं नागरिक हवालदिल!

पोलिसांनी या प्रकारात कंपनीच्या तीन वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक केली असली, तरी कंपनीच्या दोन संस्थापकांनी विदेशात पलायन केल्याचा संशय पोलिसांना आहे. हे दोघे युक्रेनचे नागरिक आहेत. हेच दोघे या सगळ्या घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जॉन कार्डर आणि व्हिक्टोरिया कोवलेन्को अशी त्यांची नावं असून या दोघांविरोधात लुकाआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

Story img Loader