दापोली: थंड आल्हाददायक वातावरणामुळे   दापोलीसह  जिल्ह्यातील   गुहागर, रत्नागिरीतील गणपतीपुळे यासारखी पर्यटन स्थळे पर्यटकांनी हाऊस फुल झाली आहेत. नाताळ बरोबर थर्टी फस्ट असल्याने पर्यटकांची पावले कोकणातील या ठिकाणी वळली असल्याने सर्व हॉटेल ही बुक झाली आहेत.

जिल्ह्यातील गणपतीपुळे, आरेवारे, भाट्ये बिच, गुहागर बिच तसेच याबरोबर दापोली शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणारा समुद्रकिनारा यामुळे पर्यटनाच्या जागतिक नकाशावर येथील पर्यटन स्थळाला  एक महत्त्वाचे स्थान आहे. सध्या नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने पर्यटनासाठी दापोलीसह जिल्ह्यातील पर्यटन स्थळे  हाऊसफुल झाली आहे. यंदा हा सीझन रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. मात्र येथील अपुऱ्या सुविधा, ऐन सिझनच्या वेळी कमी पडणारी निवासव्यवस्था हे येथील प्रश्न अद्याप ‘जैसे थे’च आहेत. यासाठी शासनाने दापोली तालुक्यासह इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणचे पर्यटन व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊन निवास  व न्याहरी व्यवस्था नव्याने उभ्या राहाव्यात यासाठी विशेष प्रोत्साहन देता येईल का यावर विचार करायला हवा, असे मत काही पर्यटकांनी व्यक्त केले आहे. पर्यटन व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आहेत, मात्र आता या व्यवसाय वाढावा तसेच  अर्थकारणाला नव्याने चांगली दिशा मिळावी यासाठी प्रयत्न करणे  आवश्यक आहेत. दापोली तालुका पर्यटन विकास आराखड्याच्या घोषणा आता पुरे झाल्या आता गरज आहे ती खऱ्या अर्थाने पर्यटन व्यवसायाला चालना देण्याची.

Manali snowfall shocking video Narrow Escape
मनालीमधील धडकी भरवणारे ७ सेकंद! ड्रायव्हरच्या एका निर्णयानं मृत्यू रोखला; VIDEO पाहाल तर मनालीचा प्लॅन कॅन्सल कराल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Instagram
सावधान! तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

हेही वाचा >>>Udayanraje Bhosale: ‘शरद पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती’, खासदार उदयनराजे भोसलेंची टीका; म्हणाले, “त्यांनी आता…”

नाताळ सणाला आलेल्या सुट्ट्यांनी दापोली तालुक्यातील मुरुड, कर्दे, लाडघर, आंजर्ले, दाभोळ, करजगाव, पाळंदे, हर्णे, केळशी हे प्रमुख समुद्रकिनारे पर्यटकांनी गलबजून गेले आहेत. स्वच्छ आणि पांढरी वाळूचे पुळण असलेले लांबचक समुद्रकिनारे लाभलेल्या दापोली तालुक्यातील कर्दे व मुरुड हे पर्यटनाचे केंद्रबिंदू बनले आहे. दापोली तालुक्याला दाभोळ ते केळशी हा ८० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. गेल्या आठ- दहा वर्षात राज्यातील पुणे, मुंबई बरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील पर्यटकांना रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांची भुरळ पडली आहे. फेसाळणाऱ्या समुद्रालाटा, रात्रीचे मंद वारा आणि गुलाबी थंडी असे वातावरण जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनाऱ्यावर डिसेंबर महिन्यापासून जाणवू लागते.

समुद्र किनारपट्टीला असणाऱ्या बागायतींमुळे थंड हवामानाचा आनंद लुटणे समुद्रात स्नान करणे तसेच बीचवर वेगवेगळ्या खेळ खेळण्यात पर्यटक गुंतून जातात पाळंदे व मुरुड मध्ये वॉटर गेम,  सँण्ड बाईक, पॅरासिलिंग, वॉटर पॅरासिलिंग, उंट व घोडागाडी सफर, सकाळच्या वेळेमध्ये डॉल्फिन सफर अशा अनेक खेळांमुळे पर्यटक इकडे आकर्षित होतात. दापोली शहराबरोबरच समुद्रकिनाऱ्यावरील नावातील ३ हजार पेक्षा अधिक निवास  योजनेतील घरे हे ४ जानेवारी पर्यंत हाउसफुल झाल्याची माहिती उपलब्ध आहे. इतर पर्यटन स्थळांच्या  ठिकाणी कमी अधिक प्रमाणात हॉटेल्स आणि निवास योजना ठिकाणे फुल झाली आहेत.

या हंगामात एक लाखावून अधिक पर्यटक दापोली तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांबरोबरच कड्यावरचा गणपती, केशवराज मंदिर, याकूब बाबा दर्गा, मुरुडचे प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिर, दाभोळ येथील चंडिका देवी मंदिर,  उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड,  पन्हाळेकाझी येथील लेणी, हर्णे समुद्रातील सुवर्णदुर्ग, कणकदुर्ग, गोवा किल्ला, रमाबाई आंबेडकरांचे स्मारक, दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठ, लाडघर येथील भव्य परशुराम पुतळा तसेच तांबडा पांढरा समुद्र आधी पर्यटन स्थळांना भेट देण्याचा अंदाज या क्षेत्रातील व्यवसायिकांनी वर्तवला आहे.  तालुक्यातील पर्यटन जवळपास वर्षभर सुरू असते.

हेही वाचा >>>दापोलीत कासवाच्या पहिल्याच घरट्यात ११८ अंडी

दापोली तालुक्यातील मुरुड कर्दे,  लाडघर हे पर्यटकांचे पसंतीचे ‘हॉटस्पॉट’ आहेत.  पर्यटकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे. येणारा पर्यटक हा येथील समुद्राचा आनंद लुटण्यासाठी खोल समुद्रामध्ये पोहोचण्यासाठी जातो पुरेसे मार्गदर्शन व माहिती अभावी एखाद्या दुर्घटनेस सामोरे जावे लागते. पर्यटकांसाठी लाइफ गार्ड,  लाईफजॅकेट, सूचना केंद्र असणे आवश्यक आहे.

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने तसेच पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेव्ण्यात आला आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी यांनी सर्वांना शांततेत सण साजरा करण्याचे  आवाहन केले आहे.

Story img Loader