वाई : महाबळेश्वर पाचगणी रस्ता पूर्ण ओबडधोबड झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यामुळे या मार्गांवर अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्यटकांच्या वाहनांचे खूप मोठे नुकसान होत आहे या रस्त्यामुळे पर्यटकांना मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी मोठ्या पावसामुळे या मार्गावर असणाऱ्या झाडांमुळे हा रस्ता खराब होतो. सध्या या रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हा मार्ग महाबळेश्वर आणि कोकणात जाणारा मुख्य मार्ग असल्यामुळे येथील रस्त्याचा रात्रीच्या वेळी काही अंदाज येत नाही. या रस्त्याला अवघड वळणे ही आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा मार्ग खड्ड्यांनी भरल्याने पर्यटकांच्या वाहनांचे खूप मोठे नुकसान होत आहे. या रस्त्यामुळे पर्यटकांना मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे. येथील रुग्णांना उपचारासाठी वाईला रुग्णालयात आणताना नातेवाईकांनाही खूप त्रास सहन करावा लागतो. पर्यटकांना प्रवासाला वेळ लागत असल्यामुळे पर्यटक संताप व्यक्त करत आहेत. पर्यटकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा… नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी सज्ज

पाचगणी महाबळेश्वर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. मात्र मागील एक महिनाभरापासून येथे सुरू असणारा पर्यटनाचा हंगामामुळे हॉटेल व्यवसायिक व स्थानिक ग्रामस्थांनी नववर्ष होईपर्यंत काम सुरू करू नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे दि २ जानेवारी नंतर येथील रस्त्याचे काम पूर्ण वेगाने सुविधा सुरू होईल. हा रस्ता दुहेरी आहे यामुळे एक रस्त्यात दुरुस्तीचे काम करताना एक वाहन उभे राहिले तरी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागतात आणि त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांनाही त्रास सहन करावा लागतो. मात्र आता काही झाले तरी पुढील आठवड्यात या रस्त्याचे काम सुरू करत आहोत. – अजय देशपांडे उप अभियंता सार्वजनिक विभाग बांधकाम विभाग महाबळेश्वर.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists annoyed due to bad road conditions towards mahabaleshwar panchgani asj