अलिबाग : पुण्‍याहून आलेल्‍या पर्यटकांनी अलिागमध्‍ये धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अलिबाग शहरात मद्यधुंद अवस्‍थेत बेदरकारपणे कार चालवून वाहनांना धडक दिली. त्‍यांनी पोलीस व स्थानिकांसोबत वाद घातला. याप्रकरणी एका महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

महिलेच्या कारने जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकांसह शहरातील काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर बेदरकारपणे वाहन चालवीत रेवदंडा बायपासजवळ एका वाहनाला जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. यात पर्यटक महिला जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीसांनी गाडीची तपासणी केली असता कारमध्ये काही दारुच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच पोलिसांशी देखील पर्यटकांनी हुज्जत घातली. मीना भोसले रा. पुणे असं या महिलेचे नाव असून तिच्‍यासह सोबत असलेल्‍या पुरूषाची वैद्यकीय चाचणी करण्‍यात आल्‍याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. दरम्यान सदर महिले विरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार मोतेरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Story img Loader