दापोली : कोकणात पावसाळी पर्यटन करण्यासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकांची ट्रॅव्हलर बस नदीपात्रात पलटली. या अपघातामध्ये सर्व अकरा प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर काढण्यात आले.
पुणे येथून फिरण्यासाठी पर्यटक दापोलीमध्ये आले होते. ट्रॅव्हलर बस क्र.एमएच १४ सीव्ही ०१८६ मधून हे सर्व पर्यटक दापोली येथील एका हॉटेलमध्ये उतरले होते. हे सर्व डौली गावाकडे फिरायला जात असताना अरुंद रस्त्यावर असलेल्या गावठाणे वाडी येथील मोरीवरून जात असताना ड्रायव्हरचा अंदाज चुकल्याने गाडी पुलावरुन खाली पाण्यात कोसळली.
आणखी वाचा-रत्नागिरी शहर समस्यांसाठी बोलवलेली सभा पालकमंत्री उदय सामंत समर्थकांनी उधळली
शनिवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. गाडीतील सर्व प्रवाशी पुण्यावरुन आलेले होते. या गाडीमध्ये एकूण ११ प्रवाशी होते. घटनास्थळी पोहचून सरपंच हरिचंद्र महाडिक, पोलीस पाटील-रुपेश महाडिक, ग्रामसेवक- सूर्यकांत मोरे, शिपाई गणेश महाडिक यांनी प्रवाशांना नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.