सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये आज सायंकाळी एका ऑइल टँकरची गळती होऊन, ऑईल महामार्गावरील रस्त्यावर सांडल्याने वाहनचालकांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागला. यामुळे चार तास वाहतूक ठप्प झाली होती.

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घाटातील भैरवनाथ मंदिराजवळ टँकरमधील ऑईलचा आऊटर पाईप फुटल्याने हे ऑईल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले. ही बाब लक्षात आली तेव्हा अंदाजे दोन किलो मीटर रस्त्यावर हे ऑईल सर्वत्र पसरले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तर महामार्गावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी माती रस्त्यावर पसरण्यात आली. यावेळी महामार्ग पोलीस वंजारी, अविनाश डेरे, फरांदे, नलावडे, कदम, ननावरे, मोरे, शेख यांच्यासह रेस्कू पथकाने रस्त्यावर माती टाकण्यास व वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

Story img Loader