वाई : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ एक गाडी बंद पडल्याने पुण्याहून साताराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी झाल्याने पुण्याकडून साताराकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटातील दत्त मंदिर वळणावर एक माल ट्रक बंद पडल्याने घाटात वाहनांच्या मोठ्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “आमचे पाय जमिनीवरच”, शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला

हेही वाचा – धाराशिव : दीड हजार वर्षांपूर्वीचे मंदिर पहायला या तेरला! चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराला मिळणार गतवैभव

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात सकाळपासून वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहनचालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात सद्या रिमझिम पाऊस सुरु आहे. शनिवारी-रविवारी सुट्टीच्या दिवशी घरी जाण्याच्या गडबडीत असलेले अनेक पर्यटक, प्रवासी हे गेले अनेक तास घाटात अडकले आहेत. घाटात चढ असल्याने क्लच प्लेट गरम होत असल्याने गाड्या बंद पडण्याचेही प्रमाण वाढले आहे. घाटात मोठी गाडी बंद पडल्याने अनेक प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. खंबाटकी घाटात ट्राफिक जाममुळे पुण्याकडून साताराकडे जाणारी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग आणि वाहतूक पोलीस प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.