लोणावळा : दोन दिवसांची सुटी संपवून घराकडे परतणाऱ्या मुंबईकरांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात या रविवारीही प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर रांगा लागल्याचे दिसले.सध्या मे महिन्याच्या सुट्टय़ा असल्यामुळे मुलांच्या मागे शाळा, अभ्यासाचा व्याप नाही. त्यामुळे शनिवार-रविवारचे दोन दिवस गावी किंवा पर्यटनाला जाण्याकडे मुंबईकरांचा कल आहे. त्यामुळे गेले काही शनिवार-रविवार आणि सलग सुट्टीच्या कालावधीमध्ये द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. २१ तारखेचा रविवारही याला अपवाद नव्हता. महामार्गावर खंडाळा घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. त्यामुळे पर्यटकांसोबतच कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुक्रवार आणि शनिवारी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर, तर रविवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खंडाळा बोगद्याजवळ काही काळाचे ब्लॉक घेत सर्व वाहने सहाही मार्गिका खुल्या करत सोडण्यात येतात. त्यामुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवरदेखील वाहतूक कोंडी होते, तर रविवारी सर्व वाहने परतीच्या मार्गावर असल्याने मुंबई मार्गिकेवरही वाहतूक कोंडी होत आहे. रविवारी संपूर्ण घाट परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाल्याने दोन्ही मार्गिकांवरील वाहनचालकांना या कोंडीचा सामना करावा लागला.