पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शनिवार व रविवारी पुण्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी हटविण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले.
काम सुरू असताना द्रुतगती मार्ग बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गाने वळविण्यात आली. आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. काम सुरू असताना अडथळा येऊ नये, म्हणून बोरघाटापासून खालापूर टोलनाक्यापर्यंतची वाहतूक जुन्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. द्रुतगती मार्ग सहा पदरी असून जुना मुंबई-पुणे महामार्ग चार पदरी आहे. एकाच वेळी दहा पदरी मार्गावरून धावणारी वाहने चार पदरी मार्गावर आल्याने शुक्रवारपासून वाहतूक कोंडी होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2015 रोजी प्रकाशित
प्रवाशांचे हाल
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे.

First published on: 26-07-2015 at 06:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on mumbai pune express highway