शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधारपाले गावाजवळ आज पहाटे महाकाय ट्रेलरला अपघात झाला. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गावाजवळच्या रस्त्याला रहदारी नव्हती. या अपघातांमध्ये ट्रेलरचा चालक जखमी झाला असून रस्त्याच्या साइडपट्टीचा अंदाज न लागल्याने अपघात घडून आल्याचे चालकाने सांगितले. तालुक्यातील गांधारपाले हे गाव प्राचीन बौद्ध लेण्यासाठी प्रसिद्ध आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आज पहाटे गोव्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रेलरला अपघात झाला. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडामुळे गावातील किराणामालाचे व्यापारी बाईत यांचे दुकान वाचले. हा अपघात दिवसा झाला असता जीवीत त्याचप्रमाणे वित्तहानी झाली असती. ट्रेलर मुंबईहून गोव्याकडे जात असताना अपघात घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक प्रमाणापेक्षा अधिक वाढल्याने रस्त्यावर वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. १० वर्षांमध्ये रस्त्याचे रुंदीकरण करताना साइडपट्टीचे काम करण्यात आलेले नाही.

Story img Loader