पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव ट्रेलर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने फूड कोर्ट ला भीषण धडक दिली. घटनेत एकाचा ट्रेलर खाली सापडून मृत्यू झाला आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. काही सेकंद अगोदर ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे सहा व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये पहायला मिळतात. बाजूला जाताच भरधाव ट्रेलरने फूड कोर्ट ला भीषण धडक दिली. इंद्रदेव पासवान या हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला आहे. बिपीन यादव अस ट्रेलर चालकाचे नाव आहे. पोलिसांनी यादव ला ताब्यात घेतलं आहे. तो पुण्याहून मुंबई च्या दिशेने जात होता.
सायंकाळी पाच वाजता भरधाव ट्रेलर ने थेट फूड कोर्ट ला भीषण धडक दिली. घटनेत हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला आहे. घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. घटनेच्या आधी अपघातस्थळी सहा व्यक्ती तिथे दिसतात. तिथून बाजूला होताच अगदी ५ ते ६ सेकंदातच नियंत्रण सुटलेला भरधाव ट्रेलर आला आणि एकाला चिरडत फूड कोर्ट ला भीषण धडक दिली. सीसीटीव्ही फुटेज विचलित करणारे आहे. सुदैवाने मोठी जीविहितहानी टळली. ट्रेलर ने काही वाहनांना धडक देखील दिली आहे. घटनेनंतर अनेक जण फूड कोर्ट मधून सैरावैरा धावत बाहेर पडले. अनेकांनी आपली वाहन आणि वाहनातील नागरिक सुखरूप आहेत का? ते पाहिले.