Pooja Khedkar Mother News: ट्रेनी आएएस अधिकारी पूजा खेडकर (Trainee IAS Pooja Khedkar) या त्यांच्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे चर्चेत आहेत. वरिष्ठ जिल्हाधिकाऱ्यांचं अँटी चेंबर बळकावणे, रुजू होण्याआधीच व्हॉट्स अॅप मेसेज पाठवून केबीन तयार ठेवा सांगणं, ऑडी या खासगी कारवर लाल आणि निळा अंबर दिवा लावणं या सगळ्या गोष्टींमुळे त्या चर्चेत आल्या. त्यांनी त्यांच्या वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालय पाहून कुठे बसायचं ती जागा निवडल्याचीही बाब समोर आली होती. आता पूजा खेडकर यांच्या आईचीही (Pooja Khedkar Mother) चर्चा रंगली आहे. पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केली आहे.

पूजा खेडकर यांच्या नावाची चांगलीच चर्चा (Pooja Khedkar Name in Discussion )

पुण्यातल्या प्रोबेशनरी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण त्यांची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. याची कारणही तशीच आहेत. पूजा खेडकर या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत. पूजा खेडकर यांनी चमकोगिरी केल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणे, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्स अॅप मेसेज करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई या संबंधीची मागणी वारंवर केली. तसंच परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून याबाबत विचारणा केली. ज्यानंतर त्यांची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे. एकीकडे पूजा खेडकर यांची चर्चा सुरु असतानाच आता त्यांच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केली आहे.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

काय म्हणाल्या पूजा खेडकर यांच्या आई? (What Pooja Khedkar Mother Said?)

“सगळ्यांनी बाजूला व्हा, इथे यायचं नाही. आलात तर एकेकाला आत टाकेन.” असं म्हणत पूजा खेडकर यांच्या आईने दादागिरी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा व्हिडीओही समोर आला आहे. पूजा खेडकर यांच्या आईचं नाव मनोरमा खेडकर आहे. त्यांनी आज अरेरावी केल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. पोलीस आणि मीडिया त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी आणि मीडियाशी त्यांनी दादागिरी केली. बंगल्यात जे लोक आहेत त्यांना विनंती केली की आम्हाला आत येऊ द्या. मात्र बंगल्याच्या आत कुणालाही आत येऊ दिलं नाही. बंगल्याला आतून कुलूप लावण्यात आलं आहे. या बंगल्यात पाच आलिशान कार उभ्या आहेत. ऑडी कार झाकून ठेवण्यात आली आहे. ही कार कुणाच्या नावावर आहे? त्यावर लावलेला दिवा कुठे आहे? याची माहिती पोलिसांना घ्यायची होती. मात्र मनोरमा खेडकर यांनी अरेरावी केली.

हे पण वाचा- Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल

मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ समोर

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे पुण्यात सध्या गाजत असतानाच तिच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते. पोलिसांनी खेडकर यांच्या बंगल्याची बेल दाबल्यानंतर आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या. मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी “मी सगळ्यांना आत टाकेल” अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आहे.

पोलीस काय म्हणाले?

“आम्ही पूजा खेडकर यांच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी अरेरावी केली. तसंच बंगल्याच्या आतून कुलूप लावून घेतलं आणि आम्हाला येण्यास मज्जाव केला. ” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक शकील पठाण यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे.

जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी पूजा खेडकरांबाबत दिलेल्या अहवालात कुठले मुद्दे?

श्रीमती पूजा खेडकर यांनी पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच कार, निवासस्थान आणि शिपाई यांच्याबाबत मागणी केली

पूजा खेडकर यांना स्वतंत्र कक्ष असणारी बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली होती, मात्र या कक्षाला बाथरुम अटॅच नसल्याने त्यांनी ती नाकारली

यानंतर खनिकर्म शाखेजवळ अटॅच्ड बाथरुम असलेलं व्हिआयपी सभागृह शोधलं आणि तिथे आसनव्यवस्थेची मागणी केली.

या कक्षातील जुन्या इलेक्ट्रीक फिटिंग बदलून नवी इलेक्ट्रीक फिटिंग करा असे सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या कक्षाशेजारी माझी आसन व्यवस्था करावी अशी मागणी केली. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाशेजारीच माझा कक्ष हवा ही मागणी केली.