प्रशिक्षणार्थी (प्रोबेशनरी) IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससीकडे खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो आहे. याआरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे एक सदस्यीय समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या आरोपांना आता पूजा खेडकर उत्तर देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूजा खेडकर यांनी आज वाशिममध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, सरकारी नियमांनुसार मी याविषयी माध्यमांशी बोलू शकत नाही. मला याविषयी बोलायची परवानगी नाही. मात्र, यासंदर्भात माझं जे काही उत्तर असेल, ते मी समितीकडे सादर करेन, अशी प्रतिक्रिया पूजा खेडकर यांनी दिली.

हेही वाचा – Pooja Khedkar : पुणे पोलिसांची नोटीस धडकताच पूजा खेडकरांच्या बंगल्यातून मोटार गायब

दरम्यान, पूजा खेडकर या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. याशिवाय यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या आरोपांची चौकशी करण्याठी आता केंद्र सरकारने एकसदस्यीय समिती स्थापन केली आहे. येत्या दोन आठवड्यात या समितीला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याच्या प्रमाणपत्राचा वापर यूपीएससी परीक्षेत सूट मिळवण्यासाठी केला होता. या परीक्षेत कमी मार्क मिळूनही त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांना देशभरातून ८४१ क्रमांक मिळाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचा आजार सिद्ध करण्यासाठी आरोग्य तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सहावेळा नोटीस देऊनही खेडकर वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या.

काही दिवसांनी पूजा खेडकर यांनी दुसऱ्याच रुग्णालयात एमआरआय चाचणी अहवाल काढून तो लोकसेवा आयोगाकडे सादर केला होता. मात्र लोकसेवा आयोगाने हा अहवाल फेटाळून लावला होता. त्यानंतर आयोगाने खेडकर यांच्या नियुक्तीला कॅट (केंद्रीय प्रशासकीय लवाद) मध्ये आव्हान देण्यात आले होते. कॅटने २३ फेब्रुवारी २०२३ रोजी खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला. मात्र काही काळाने त्यांचा एमआरआय अहवाल स्वीकारला गेला आणि त्यांची आयएएस अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा – आता IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा चर्चेत; गावकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावतानाचा Video व्हायरल!

गैरवर्तनामुळे पूजा खेडकर यांची बदली

दरम्यान, पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला होता. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.