“एसटीच्या इतिहासात कधी मिळाली नसेल एवढी म्हणजे ४१ टक्के वाढ सरकारने दिली. यामुळे १० वर्षे ते ३० वर्षे सेवा करणार्या कर्मचाऱ्यांना २४ हजार ते ५६ हजार रुपये वेतन मिळणार आहे. तसेच न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्त समितीच्या शिफारशीनुसार विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा” असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्या्ंच्या संपावर चर्चा सुरू असून आता राज्य सरकारकडून पगारवाढ आणि वेतनहमीबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, एसटी कर्मचारी अद्याप माघार घ्यायला तयार नसताना आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. एकूणच एसटी कर्मचारी आंदोलन आणि राज्य सरकारची भूमिका याविषयी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी लोकसत्ताचे सहयोगी संपादक संदीप आचार्य यांनी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचित…