‘ग्रीन सिटी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शहरातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या नागपूरकरांची छाती अभिमानाने फुलली. मात्र, आता त्याच मुख्यमंत्र्यांच्या स्वागतात काही उणीव राहून नये म्हणून भाजपच्या एका नगरसेवकाने पालिका कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लक्ष्मीनगरातील आठ रस्ता चौक ते ऑरेंज सिटी चौकादरम्यान सर्रास वृक्षतोड मोहीमच राबवली.
फडणवीस रविवारी नागपूरला येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक संदीप जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील लक्ष्मीनगर भागातच असंख्य स्वागत फलक उभारले आहेत. या फलकांना अडसर ठरत असलेल्या अनेक झाडांची त्यासाठी तोड करण्यात आली. नगरसेवक संदीप जोशी यांच्या पत्नी देवयानी जोशींकडूनच तसे आदेश आल्याचे ही वृक्षतोड करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Nov 2014 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी नागपुरात सर्रास वृक्षतोड!
‘ग्रीन सिटी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शहरातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या नागपूरकरांची छाती अभिमानाने फुलली.
First published on: 02-11-2014 at 04:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree cutting to welcome cm fadnavis in nagpur