वाई, खंडाळा येथे आज सायंकाळी आवकाळी पावसाने हजेरी लावली. खंडाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली. त्यामुळे खंडाळा-लोणंद रस्त्यावरील वाहतूक बंद पडली.
आज दिवसभर वाई, भुईंज, खंडाळा येथे ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणातील उकाडा वाढला होता. खंडाळा तालुक्यात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागातील झाडे पडली. खंडाळा-लोणंद रस्त्यावरही झाडे पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. अनेक ठिकाणी वीजवाहक तारांवर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे अनेक भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत अधिक नुकसानीची माहिती मिळू शकली नव्हती. मंगळवारीच याच भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात धावडवाडी येथे वीज पडून शेतात काम करणा-या दोघांचा मृत्यू झाला होता.

Story img Loader