गडचिरोली: पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी बुधवारी रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथील एका इसमाची हत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लकीकुमार ओक्सा (३८) असे मृत इसमाचे नाव आहे. मृतक बिनागुंडा येथील मूळ रहिवासी होता. तो मलमपोडूर येथे तेंदूपत्ता फळीवर मुंशी म्हणून काम पाहत होता. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी मलमपोडूर येथे आले.

त्यांनी लकीकुमारला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि नंतर धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे.