पद्मभूषण कविवर्य कै. मंगेश पाडगांवकर यांना येत्या शनिवार, दि. ९ जानेवारी रोजी सायं. ६ वा. संस्थानच्या राजवाडय़ात संगीतमय आदरांजली वाहण्यात येणार आहे. संवेदना ग्रुपने हा आदरांजली कार्यक्रम आयोजित केला असून, त्यात मंगेश पाडगांवकर आणि कोकणचे अतूट नाते काव्यमय, संगीतमय, संवादमय व चित्रमय स्वरूपात मांडणी करण्यात येणार आहे.
कविवर्य कै. मंगेश पाडगांवकर यांच्या आदरांजलीचा हा कार्यक्रम संवेदना ग्रुपने आयोजित केला. त्याला सावंतवाडी संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्वशिलादेवी यांनी संमती देत राजवाडय़ात संगीतमय आदरांजली कार्यक्रम व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली असे संवेदना ग्रुपचे प्रमुख भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले.
राजकीय पादपात्रे बाजूला ठेवून संवेदना ग्रुप बनविला आहे. त्यात चित्रकार नामानंद मोडक, पत्रकार दिनेश केळुसकर, कवी प्रभाकर सावंत, अॅड. सिद्धार्थ भांबूरे, बाळ पुराणिक, मनोज नाईक, आनंद नेवगी, अन्नपूर्णा कोरगावकर, सागर हरमलकर आदींचा समावेश आहे, असे अतुल काळसेकर म्हणाले. सर्वपदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगांवकर सावंतवाडी, वेंगुर्लेचे अर्थातच सिंधुदुर्गचे सुपूत्र होते. त्यांचे कोकणच्या लाल मातीशी नाते होते. या लाल मातीतील मालवणी भाषेत त्यांना कविता किंवा साहित्य सुचायचे ते मराठीत रूपांतरीत करायचे अशा आठवणींचा धुंडाळा या कार्यक्रमात ऐकायला मिळेल असे अतुल काळसेकर म्हणाले.
संवेदना ग्रुपने राजवाडा सावंतवाडीत आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्यात मालवणी कवी दादा मडकईकर, नामानंद मोडक, दिनेश केळुसकर, बाळ पुराणिक, प्रभाकर सावंत, डॉ. विद्याधर करंदीकर आदींची मांडणी असेल. संगीतमय आदरांजली वाहताना काव्यवाचन, संवाद, चित्र, संगीत अशा सर्व अंगांना आदरांजली कार्यक्रमात स्पर्श करण्यात येईल, असे अतुल काळसेकर म्हणाले.
सावंतवाडी, वेंगुल्र्याला मंगेश पाडगावकरांच्या आठवणी आणि त्यांचा सहवास लाभला. त्याही पलीकडे कोकणच्या लाल मातीशी त्यांचे ऋणानुबंध या ठिकाणी मांडण्यात येतील. मंगेश पाडगांवकर यांची वि. दा. करंदीकर, जयवंत दळवी, बा.भ. बोरकर, मधु मंगेश कर्णिक, वसंत सावंत, आरती प्रभु यांच्या साहित्य सहवासातील मैत्रीदेखील मांडली जाईल. चित्रकार नामानंद मोडक यांच्या चित्रातील शैलीतून आगळीवेगळी आदरांजली पाहायला मिळेल. सावंतवाडी राजवाडय़ाचा बॅगराऊंड आणि नेपथ्य मंगेश पाडगांवकर यांच्या स्वभावगुणावर प्रकाश टाकणारा ठरेल. बायबलची मराठी भाषांतर प्रत बनविणारे मंगेश पाडगांवकर आणि रोडिओ जुलेटची सादरीकरणदेखील होईल, असे अतुल काळसेकर म्हणाले.
कविवर्य मंगेश पाडगांवकर यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे काळसेकर म्हणाले.
मंगेश पाडगांवकर यांना सावंतवाडीत आदरांजली
कविवर्य कै. मंगेश पाडगांवकर यांच्या आदरांजलीचा हा कार्यक्रम संवेदना ग्रुपने आयोजित केला.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 06-01-2016 at 06:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribute to marathi poet mangesh padgaonkar in sawantwadi