गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड; खाजगी बसचालकांकडून अवास्तव आकारणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गणेशोत्सवासाठी खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने कोकणात जाणाऱ्यांसाठी तिप्पट दर भरावे लागणार आहेत. करोनामुळे बसमधील मर्यादित प्रवासीसंख्या आणि इतर खर्चाचे कारण बसचालकांनी दिले आहे. मात्र सर्वसामान्य कोकणातील रहिवाशी मात्र या भाडेवाढीमुळे भरडला जात आहे.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दरवर्षी मुंबई आणि परिसरातील हजारो चाकरमानी गणेशोत्सावासाठी  कोकणात जात असतात. पण सध्या करोना आणि शासकीय नियमांमुळे ही संख्या घटली असली तरी अजूनही मोठय़ा संख्येने लोक गावी जात आहेत. रेल्वे बंद असल्याने खाजगी बसेस हाच पर्याय आहे. मात्र दरवर्षी चाकरमान्यांची गरज लक्षात घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स चालक भाडेवाढत असतात. यंदाही कोकणात जाण्यासाठी तिप्पट भाडेवाढ केली आहे. आधीच करोनाने आर्थिक कंबरडे मोडले असता केवळ प्रवासासाठी एका प्रवाशाला दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. आधी हेच भाडे केवळ ५०० ते ७०० रुपये होते. पण आता दर ट्रॅव्हल्सवाल्यांनी दर वाढविल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ट्रॅव्हल्सचालक भाडेवाढीचे समर्थन करताना करोना आणि टाळेबंदीमुळे आलेल्या आर्थिक संकटाचे कारण पुढे करत आहेत. गणेश कृपा ट्रॅव्हल्सचे मालक संतोष बेनेकर यांनी माहिती दिली की, शासनाने आम्हाला केवळ २१ प्रवासी घेऊन जाण्याची मुभा दिली आहे. त्यातही प्रवाशांचे परमिट, ई पास, डिझेलचा खर्च, चालकाचा पगार या सर्व बाबींवरचा खर्च वाढला आहे. तर येताना बस रिकामी आणावी लागत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर नियमित करही भरावे लागत आहेत.

कोकणात जाण्यासाठी रेल्वे आणि शासकीय बस सेवा नसल्याने नागरिकांना खाजगी बस सेवेवर अवलंबून राहावे लागत आहेत. इतकेच नाही तर येथून गावी गेल्यावर त्यांना १४ दिवस अलगीकरणात राहावे लागत आहे.  त्याचा सुद्धा खर्च त्यांना करावा लागत आहे. वाढलेले प्रवास दर सामान्यांना परवडत नसतानाही त्यांना नाईलाजाने पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे शासनाने एसटीसेवा गणपतीसाठी निदान सुरू करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

गणपती सण आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे, या सणासाठी आम्ही वर्षभर वाट पाहत असतो, यावर्षी आधीच करोनामुळे सामान्य नागरिकांकडील पैसे संपले आहेत. त्यात प्रवासाचे दर इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्याने आम्ही काय करायचे, गावी तर जावे लागणार म्हणून पदरमोड करून प्रवास करत आहोत.

– प्रकाश पांडुरंग परब, प्रवासी

मागील तीन महिन्यांपासून ट्रॅव्हल्सवाल्यांचा धंदा ठप्प झाला आहे, यात आता धंद्याचा मोसम असताना शासनाने जाचक अटी लावल्या आहेत. डिझेलचे दर वाढले, चालकाचा पगार, प्रवासी कर या सर्वाचा खर्च करावा लागत असल्याने आणि त्यात प्रवाशांची संख्या कमी झाली असल्याने आम्ही दर वाढविले आहेत.

– बाजीराव गुद्दे, विमल ट्रॅव्हल्स, विरार