फडणवीस सरकारने खूप त्रास दिला. पण महाआघाडीचे सरकार आल्यानंतर न्याय मिळाला. काम करायला संधी मिळाली, असे मत प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.
वंजारवाडी (ता. नेवासा) येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. लहाने म्हणाले, मागील सरकारने खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकार आल्यानंतर मंत्री मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासन स्तरावर काम करण्याची संधी दिली. मुंडे यांना चांगल्या कामांसाठी आपला पाठिंबा आहे असे ते म्हणाले.