तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती अर्थात पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर राव सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी संभाजीनगरमधील सभेत भाषणही केलं. या भाषणात चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच, उपस्थित जनसमुदायाला महाराष्ट्रात बीआरएसचं सरकार आणण्याचं आवाहनही केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना चंद्रशेखर राव यांनी सगळ्यात महत्त्वाच्या पाण्याच्या समस्येला हात घातला.

चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची जोरदार चर्चा चालू होती. विशेषत: भाजपविरोधी पक्षांच्या आघाडीसंदर्भात चंद्रशेखर राव यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आले होते. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात उतरलेली असताना त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आपल्या भाषणात त्यांनी मुंबईचाही उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“महाराष्ट्रात बीआरएसचं सरकार बनवा, पाच वर्षांत..”

यावेळी भाषणात चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी महाराष्ट्रात टीआरएसचं सरकार आणण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. “टीआरएसचं हे लक्ष्य आहे की पूर्ण देशात आज जे पाण्याचं धोरण आहे ते बंद करायला हवं. नवी व्यवस्था जोपर्यंत आपण आणत नाही, तोपर्यंत हा तमाशा असाच चालत राहील. पाणी समजून घेण्यात आपला देश अजूनही मागे आहे. महाराष्ट्रात टीआरएस सरकार बनवा. पाच वर्षांच्या आत प्रत्येक घरात नळ कनेक्शनसह प्यायचं पाणी मिळेल हा माझा शब्द आहे”, असं जाहीर आश्वासनच चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिलं.

“जनता काय सोन्याची वीट मागते का?”

दरम्यान, आपल्या भाषणाच चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवरही अप्रत्यक्षपणे टीकास्र सोडलं. “महाराष्ट्रात इतक्या नद्यांचा उगम होतो. खचितच कुठल्या राज्यातून इतक्या नद्या वाहतात. देशाची आर्थिक राजधानी मुंबई जिथे आहे, ते राज्य प्यायचं पाणी देऊ शकत नाही? कृपा करून यावर विचार करा. जनता काय मागते? सोन्याची वीट थोडीच मागतेय?” असा सवालच त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Story img Loader