विविध मंदिरातील महिलांच्या प्रवेशाच्या मद्द्यावरून चर्चेत आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे गृहमंत्रीपद सक्षम नेत्याकडे देण्याची मागणी केली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रीपदाचा कार्यभार आहे. सक्षम नेत्याकडे गृहमंत्रीपद देण्याची मागणी करून तृप्ती देसाई यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे.
वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत तृप्ती देसाई म्हणाल्या, गृहमंत्रीपद हा काही पार्टटाईम जॉब नाही. त्यामुळे एखाद्या सक्षम नेत्याकडेच मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली पाहिजे. तसे केले तर राज्यात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित व्हायला आणखी मदत होईल. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळा विस्तारात मुख्यमंत्र्यांनी याचा नक्की विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
युती सरकार आल्यानंतर महिलांवरील हल्ले वाढले असल्याचे सांगत सक्षम नेत्याकडे गृहमंत्रीपद देण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा