सातारकरांना चांगले रस्ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र सदैव विरोधात बोलणारे विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आमच्यावर टीका-टिपण्णी आणि आरोप करत आहेत, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
काही दिवसांपूर्वी नगरसेवक कल्याण राक्षे यांनी त्यांच्या वार्डातील रस्त्याचे काम बंद पाडले होते. निकृष्ठ प्रतीचा रस्ता तसेच रस्ता तयार करण्याचा परवाना नसताना ठेकेदार तो रस्ता करत असल्याचा आरोप करत राक्षे यांनी हे काम बंद पाडले होते. यानंतर आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक राजेंद्र चोरगे यांनी ठेकेदार आणि नगरपालिक यांचे अर्थपूर्ण संबंध असून सातारकरांच्या पशाची नगरपालिका उधळपट्टी करत असल्याचा आरोप केला होता. यावर पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे यांनी उत्तर दिले.
रस्त्याचे कोटिंग पावसाळा झाल्यावरच करणार आहोत, असे सांगून सध्या पाणी पुरवठय़ाच्या पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच रस्त्याच्या डागडुजीचे कामही सुरू आहे. सातारकरांची यात गरसोय होत असली तरी चांगल्या दर्जाचे काम व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आ. भोसले म्हणाले.
यावेळी त्यांनी कचरा कुंडीतील कचरा घंटा गाडय़ांमध्ये भरून फेऱ्या वाढवणाया ठेकेदारांवर कारवाई करण्याचेही सांगितले.
सातारकरांना चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न- शिवेंद्रसिंहराजे
सातारकरांना चांगले रस्ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र सदैव विरोधात बोलणारे विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष ठेऊन आमच्यावर टीका-टिपण्णी आणि आरोप करत आहेत, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
First published on: 13-05-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Try to give better roads to satara shivendraraje