लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : सांगलीच्या बाजार समितीत नवीन हंगामातील हळदीला मंगळवारी झालेल्या सौद्यात क्विंटलला २१ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला. नव्या हंगामातील ३ हजार ८१३ पोती हळदीची आवक झाली असून सरासरी १५ हजार २०० रुपये दर मिळाला.

नवीन हंगामातील हळद सौद्याचा आज जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आणि मदत व पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी सभापती सुजय शिंदे, उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक संग्राम पाटील, बाबगोडा पाटील, आनंदराव नलवडे, काडाप्पा वारद, मारूती बंडगर, प्रा. सिकंदर जमादार, सचिव महेश चव्हाण, सांगली चेंबर्सचे पदाधिकारी, व्यापारी, अडत दुकानदार, खरेदीदार व शेतकरी उपस्थित होते.

या वेळी मुहूर्ताचा सौदा जय श्रीराम ट्रेडर्स या अडत दुकानात काढण्यात आला. बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी नितीन कोकाटे यांच्या हळदीला सर्वोच्च २३ हजार १०० रुपये बोली लावून मनाली ट्रेडिंग कंपनीने हळद खरेदी केली.

नवीन हंगामात कमाल दर २३ हजार १०० रुपये तर किमान दर १३ हजार ५०० रुपये मिळाला असून सरासरी दर १५ हजार २०० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला असल्याचे सचिव श्री. चव्हाण यांनी सांगितले. सांगली बाजारपेठ हळदीच्या खरेदी-विक्रीसाठी विश्वासार्ह आणि खात्रीलायक मानली जात असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी योग्य मूल्यासाठी हळद सांगली बाजारात विक्रीसाठी आणावी, असे आवाहन सभापती श्री. शिंदे यांनी या वेळी केले.