काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे, शिंदे गट आणि भाजपाचे नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण अधिकच चिघळलं. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपा व मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका सुरू झाली. एवढच नाहीतर राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी एक ट्विटर पोल घेतला आहे. ज्याचा निकाल समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “राज्य सरकारला जर वाटत असेल की ते कायदेशीर सत्तेत आहेत, तर त्यांनी लवकर…”; सचिन अहिरांचं विधान!

आदित्य ठाकरे यांनी ट्विटर पोलमध्ये, “महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी पदमुक्त केले पाहिजे का?” असा प्रश्न विचारला होता आणि त्याच्या खाली १. होय २. उशीर झाला आहे. ३. नाही, मी महाराष्ट्रद्वेषी! असे तीन पर्यात दिले होते.

नक्की पाहा – PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

या पोलच्या निकालात १. होय – ७९.५ टक्के, २. उशीर झाला आहे – १३.४ टक्के ३. नाही, मी महाराष्ट्रद्वेषी! – ७.१ टक्के अशी आकडेवारी समोर आली आहे.

हेही वाचा – “महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे; आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना सवाल!

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले होते? –

“तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter poll by aditya thackeray after governor koshyaris controversial statement about shivaji maharaj see what is the result msr
Show comments