लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कासा: मुंबई अहमदाबाद महामार्गावर बारा तासांमध्ये दोन वेगवेगळे अपघात घडले. एका अपघातामध्ये लक्झरी बसने पेट घेतला. तर दुसऱ्या अपघातामध्ये बाईकस्वाराचा अपघात घडला. यामध्ये बाईकस्वारचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.

शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान मुंबई अहमदाबाद महामार्गावरून अहमदाबादकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या लक्झरी बसला चिंचपाडा भागात अचानक आग लागली. बसमधून धूर येऊ लागल्याने चालकाने प्रसंगवधान राखत लक्झरी बाजूला केली. याच दरम्यान बस मधील १६ प्रवासी यांना सुखरूप बाहेर काढले. दोन चालक व त्यांचा एक सहकारी बसमधून सुखरूप खाली उतरल्यानंतर बसने मोठा पेट घेतला. या घटनेमध्ये लक्झरी बस संपूर्णतः जळून खाक झाली आहे

आणखी वाचा- Bhiwandi Building Collapsed: भिवंडीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; ९ जखमी, दहा-बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

दुसरी घटना आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली. महामार्गाच्या तवा परिसरात मुंबई कडून मनोरकडे जाणाऱ्या बाईकला अपघात झाला. या अपघातात बाईकस्वार जागीच ठार झाला. तर बाईकस्वार सोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी असून त्याला तवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे.