लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेले टाटा मेगा पिकअप वाहन दंड भरल्यानंतर सोडण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि स्वतःसाठी लाच घेताना मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्या दोघांविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याचीही चौकशी केली जात आहे.

nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
Social welfare officers of Satara arrested in Sangli while taking bribe
साताऱ्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना लाखाची लाच घेताना सांगलीत अटक
ghatkopar hoarding case
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित
tehsildar and kotwal of kaij tahsil caught red handed while taking bribe
केज तहसीलदार, कोतवाल सापळ्यात; धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई
sujata saunik likely to be first woman chief secretary
सुजाता सौनिक पहिल्या महिला मुख्य सचिव? नितीन करीर यांना निरोप
kashmira pawar, Gaikwad,
सातारा : कश्मिरा पवार, गायकवाडला दोन दिवस पोलीस कोठडी

नायब तहसीलदार प्रकाश विश्वनाथ सगर (वय ५५) आणि महसूल सहायक विवेक विठ्ठल ढेरे (वय ३२) या दोघांना या लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मंगळवेढ्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयातच ही कारवाई झाली.

आणखी वाचा-तरूणांतील व्यसनाधीनता रोखण्यासाठी श्रध्दा व संस्काराची गरज, सरसंघचालकांचे सोलापुरात सिध्देश्वर दर्शन

यातील तक्रारदाराचे टाटा मेगा पिकअप वाहन २०२० साली अवैध वाळू वाहतूक करताना सांगोला तहसीलदारांनी पकडला होता. त्यावर एक लाख ३७ हजार ६८४ रूपये दंडाची आकारणी झाली होती, त्यानुसार तक्रारदाराने शासकीय चलनाद्वारे दंडाची रक्कम भरली होती. जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी मंगळवेढ्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्यामुळे तक्रारदाराने त्यानुसार तेथे अर्ज केला होता. मात्र वाहन सोडण्यासाठी तेथीला नायब तहसीलदार सगर आणि महसूल सहायक ढेरे यांनी स्वतःसाठी आणि उपविभागीय अधिकारी (मंगळवेढा) यांच्यासाठी २० हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडीत १० हजार रूपयांची लाच देण्याचे ठरले.

दरम्यान, याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात दाद मागिताली. त्यानुसार पडताळणी होऊन मंगळवेढ्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा लावण्यात आला. याच पाच हजार रूपयांचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार व पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.