सोलापूर : परभणीच्या घटनेपाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचे पडसाद सोलापुरात उमटत आहेत. त्यातून निषेध आंदोलनाचे सत्र सुरू असताना अक्कलकोट रस्त्यावर एक एसटी बस लोखंडी रॉड आणि हातोड्याने फोडण्यात आली. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुण्यातील स्वारगेटहून अक्कलकोटला प्रवासी घेऊन निघालेली एक एसटी बस (एमएच १४ केक्यू १०६४) सोलापूरमार्गे अक्कलकोटच्या दिशेने जात असताना वाटेत कुंभारी येथे अज्ञात तरुणांनी अमित शहा यांच्या निषेधार्थ घोषणा देत ही बस अडविली. बसमधील सर्व ३५ प्रवाशांना बळजबरीने खाली उतरविले. चालकाच्या ताब्यातील चावी बळजबरीने घेऊन बस चालवून पुढे उड्डाणपुलाखाली नेली. हातोडा आणि लोखंडी रॉडने हल्ला करून बसची नासधूस केली. यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची बसचालक चंद्रकांत ज्ञानबा चौधरी यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा >>>मुंबई गोवा महामार्गावर धावत्‍या बसला आग, सुदैवाने सर्व ३४ प्रवासी बचावले

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्यात एक पोलीस कुंभारी येथे घटनास्थळी धावून आले. परंतु तोपर्यंत हल्लेखोर तरुण पळून गेले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी राहुल उर्फ गोट्या निकंबे आणि अक्षय कोंडीबा निकंबे (दोघे रा. कुंभारी) यांना अटक करण्यात आली आहे.

सोलापुरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन एस्टी बसवर दगडफेकीचे प्रकार घडले असून सोलापूर मध्यवर्ती एस्टी बस आगारात थांबलेली एक शिवशाही बस जाळण्यात आली होती.