करमाळय़ातील एका विद्यार्थिनीची छेडछाड करून तिच्याशी केलेले अश्लील संभाषण समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केले आणि तिच्या पित्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापकाला या कृत्यासाठी मदत करणा-या दोघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अटक झालेल्यांमध्ये करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. प्राध्यापकासह तिघांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
करमाळा येथील एका शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थिनीशी सलगी करून भ्रमणध्वनीद्वारे अश्लील भाषेत संभाषण केले आणि हे संभाषण समाजमाध्यमांतून व्हायरल करून त्या विद्याíथनीची मानहानी केली म्हणून, संबंधित प्राध्यापकाविरुद्ध कारवाई होण्यासाठी पीडित विद्याíथनीच्या दुर्दैवी पित्याने पोलिसात धाव घेतली खरी, परंतु दाद घेतली गेली. त्यामुळे अखेर मनस्ताप होऊन त्या विद्यार्थिनीच्या पित्याने आत्महत्या केली. या संतापजनक घटनेमुळे करमाळा परिसरात खळबळ माजली असता अखेर पोलिसांनी संबंधित प्रा. वामन शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नंतर त्यास अटकही करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी करमाळय़ात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि घटनेची माहिती घेतली. यात पोलीस यंत्रणाही तेवढीच जबाबदार असल्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्याचीही चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार डॉ. गो-हे यांनी लावून धरली आहे.
या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी तपासाची सूत्रे आणखी फिरवून प्रा. िशदे यास मदत केल्याप्रकरणी करमाळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन रामचंद्र घोलप आणि केडगावच्या म. गांधीजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोराडे या दोघांना अटक केली आहे.
प्रा. वामन शिंदे हा यापूर्वी पोलीस कोठडीत असताना गुन्ह्याचा कट रचणे, पीडित फिर्यादीला पोलिसांपर्यंत पोहोचू न देणे, दबाव आणणे, शिवाय ब्लॅकमेलिंग करून प्रा शिंदे यास मदत केल्याने करमाळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोलप आणि कडेगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोराडे यांना अटक करण्यात आली. या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रा.शिंदे हादेखील सध्या पोलीस कोठडीतच आहे. याप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीप्रसंगी सरकारतर्फे अ‍ॅड. रामदास वागज यांनी काम पाहिले, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. जयदीप माने आदींनी बाजू मांडली.

Story img Loader