लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात दोन सहाय्यक अभियंत्यांना नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. रेष्मा ओमकार नाईक, आणि सतीश वसंत कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.

गावातील विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी उरण येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता रेश्मा नाईक यांनी ३० हजार रुपयाांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ८ फेब्रुवारीला लाचप्रकरणाची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत रेश्मा नाईक यांनी स्वतःसाठी तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता सतीश कांबळे यांच्यासाठी ३० हजारांची लाच मागीतली, तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारण्याचे कबुल केले.

आणखी वाचा-महाबळेश्वर येथे २३ ते २५ फेब्रुवारी शंभरावे विभागीय नाट्यसंमेलन

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ फेब्रुवारी रोजी सापळा लावला होता. मात्र रेश्मा नाईक यांनी लाचेची रक्कम रायगड जिल्हा परिषदेत अलिबाग येथे सहाय्यक अभियंता सतीश कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितली. सतीश कांबळे यांनी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजून ५५ मिनटांनी ही लाचेची रक्कम स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक नवीमुंबईच्या विभागाने त्यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी दोन्ही सहाय्यक अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.