सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ गांजा वाहतूक करणाऱ्या दोन मोटारी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेने पकडल्या. यात १०५ किलो ३८० ग्रॕम वजनाचा गांजा सापडला. याप्रकरणी दोघाजणांना अटक झाली असून त्यांची रवानगी ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाचे मूल्य २१ लाख ७६०० रूपये दर्शविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> सोलापुरात कांद्याचा वांदा सुरूच, उच्चांकी आवक; दर पार कोसळले

दोन्ही जप्त मोटारींची किंमत १५ लाख रूपये इतकी आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज निंबाळकर व सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकाने मोडनिंबजवळ सापळा लावला. त्यावेळी ठरल्याप्रमाणे आलेल्या दोन मोटारी अडविण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही मोटारी न थांबता पुढे अरणच्या दिशेने भरधाव वेगाने निघाल्या. पाठलाग करून दोन्ही मोटारी पकडण्यात आल्या. तपासणीत दोन्ही मोटारींमध्ये गांजाचा साठा सापडला. दोन्ही मोटारचालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत सहायक फौजदार श्रीकांत गायकवाड, नीलकंठ जाधवर, म. इसाक मुजावर, हवालदार परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजय भरले, हरिभाऊ पांढरे आदींनी भाग घेतला होता.