जिल्ह्यात एक जिवंत व एक मृत स्त्री अर्भक सापडल्याने खळबळ उडाली असून लासलगाव शहर रेल्वे स्थानकाजवळील पुलाखाली बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळून आले, तर नाशिक शहरातील मोरवाडी परिसरात जिवंत अर्भक सापडले.
लासलगाव रेल्वे पुलाजवळच टाकळी-विंचूर परिसरातील छोटी वस्ती असून येथील काही जणांना पुलाखाली स्त्री अर्भक मृतावस्थेत दिसले. त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली. हे अर्भक पिशवीत घालून धावत्या रेल्वेतून फेकण्यात आले होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अर्भक पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. स्थानिक युवकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतले. सकाळी नाशिककडे पंचवटी, सेवाग्राम व भुसावळ या गाडय़ा रवाना झाल्या होत्या. त्यामुळे या गाडय़ांपैकी कोणत्या तरी गाडीतून हे अर्भक फेकले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नाशिकमधील मोरवाडी भागात केशव गामणे यांच्या चाळीमागे रोहित्राजवळ जिवंत स्त्री अर्भक सापडले. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर हे अर्भक ताब्यात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात स्त्री अर्भक सापडण्याच्या दोन घटना
जिल्ह्यात एक जिवंत व एक मृत स्त्री अर्भक सापडल्याने खळबळ उडाली असून लासलगाव शहर रेल्वे स्थानकाजवळील पुलाखाली बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळून आले, तर नाशिक शहरातील मोरवाडी परिसरात जिवंत अर्भक सापडले.
First published on: 10-01-2013 at 04:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two cases of born girl child found in nashik distrect