सांगली : माणदेशातील आटपाडीच्या उत्तरेश्वर कार्तिक यात्रेत मेंढय़ांच्या खरेदी-विक्रीमध्ये सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली. हौसी मेंढपाळांनी आपली जनावरे वाजत, गाजत व सजविलेल्या वरातीच्या रथातून आणली. यंदाच्या बाजारात मेंढय़ाला ३५ लाखांची सर्वोच्च बोली लागली. आटपाडीचे ग्रामदैवत असलेल्या उत्तेरश्वर देवाची दोन दिवसांची कार्तिक यात्रा बुधवारी समाप्त झाली. या निमित्ताने माणदेशात प्रसिध्द असलेल्या शेळी- मेंढीचा मोठा बाजार भरविण्यात आला होता. बाजारात विक्रीसाठी सात ते आठ हजार जनावरे आली होती. काल व आज झालेल्या बाजारात सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली. या यात्रेपासून माणदेशातील विविध गावच्या यात्रांना सुरूवात होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा