खंडाळा तालुक्यात आज दुपारी जोरदार वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट सुरु असताना शेतात काम करणा-या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. ही घटना धावडवाडी, ता. खंडाळा येथे दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली. यात एक महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. द्वारकाबाई तुकाराम बिचुकले (वय ५५, रा. अहिरे) व निखिल चंद्रकांत शिंदे (वय, २२, रा. हरळी) हे दोघेही टोमॅटोच्या शेतात काम करीत होते. दुस-या एका घटनेत पाटखळमाथा येथे झाडावर वीज पडून नऊ शेळ्या, तसेच एक गाय जागीच ठार झाली.
खंडाळ्यात वादळी पाऊस; दोघांचा मृत्यू
खंडाळा तालुक्यात आज दुपारी जोरदार वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट सुरु असताना शेतात काम करणा-या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. ही घटना धावडवाडी, ता. खंडाळा येथे दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली.

First published on: 28-05-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two death due to storm windy rain in khandala