खंडाळा तालुक्यात आज दुपारी जोरदार वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट सुरु असताना शेतात काम करणा-या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. ही घटना धावडवाडी, ता. खंडाळा येथे दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली. यात एक महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. द्वारकाबाई तुकाराम बिचुकले (वय ५५, रा. अहिरे) व निखिल चंद्रकांत शिंदे (वय, २२, रा. हरळी) हे दोघेही टोमॅटोच्या शेतात काम करीत होते. दुस-या एका घटनेत पाटखळमाथा येथे झाडावर वीज पडून नऊ शेळ्या, तसेच एक गाय जागीच ठार झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two death due to storm windy rain in khandala