वाई: साताऱ्यातील महाबळेश्वर लगतच्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला वाळणे ( ता महाबळेश्वर)गावात ही दुर्दैवी घटना घडली. १२ ते १३ वयोगटातील चार मुली आज रविवारी दुपारी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात पोहायला गेल्या होत्या . पोहत असताना त्यातील तिघी बुडाल्या.यावेळी मुलींनी व लगतच्या लोकांनी आरडाओरडा केला.
यावेळी गावकरी मंडळी जमा झाली. त्यांनी सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला . यावेळी एकीचा जागी मृत्यू झाला. तर तिघीना उपचारासाठी तापोळा येथे आणण्यात आले.तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना महाबळेश्वर येथे पाठविण्यात आले . उपचार सुरू असताना एकीचा मृत्यू झाला. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघींना वाचविण्यात यश आले. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.